आमिर खानचा (Aamir Khan) ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये खूप चर्चेत आहे, जो ११ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात आमिर खानसोबत करीना कपूर (Kareena Kapoor) दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर २९ मे रोजी म्हणजेच आयपीएलच्या फायनलच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. मात्र ट्रेलर येण्यापूर्वीच आमिर खानचा हा चित्रपट वादात सापडला आहे. या चित्रपटाला हिंदू संघटनांनी विरोध केला आहे. एवढेच नाही, तर संघटनेशी संबंधित लोकांनी आमिर खानचे पोस्टरही रस्त्यावर जाळले आहेत.
रिपोर्टनुसार, हिंदू संघटनेशी संबंधित लोकांनी उत्तर प्रदेशातील सुलतानपूरमध्ये आमिर खान आणि त्याच्या ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटाला विरोध केला आहे. यादरम्यान आमिर खानचे पोस्टर रस्त्यावर फाडण्यात आले आणि जाळण्यातही आले. इतकंच नाही, तर ‘लाल सिंग चड्ढा’चा ट्रेलर रिलीझच्या दिवशी आमिर खान आणि या चित्रपटाला विरोध करण्यासाठी संघटनेशी संबंधित लोक रस्त्यावर उतरणार आहेत. (aamir khan movie laal singh chaddha in controversy protest by sanatan rakshak sena)
आमिर खानच्या चित्रपटाला विरोध करताना सनातन रक्षक सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल सिंग म्हणाले, “आमिर खानला आयपीएलमध्ये बोलावण्यात आले आहे. आमिर अनेकदा भारताच्या संस्कृती आणि सभ्यतेच्या विरोधात बोलतो. हा तोच आमिर खान आहे, जो हिजाबचा सर्वात मोठा समर्थक आहे. स्वतःची मुलगी फेसबुकवर कसे फोटो शेअर करते, हे सगळ्यांनाच माहीत आहे. त्याची पत्नीही भारतात राहायला घाबरते. आयपीएल व्यवस्थापन अशा लोकांना कसे बोलावू शकते? यामुळे सर्व सनातनी त्रस्त आहेत. त्यांना हटवण्यात यावे आणि हे मान्य नसेल तर आम्ही दिल्लीपर्यंत विरोध प्रदर्शन करू. आंदोलन करू.”
आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट १४ एप्रिल रोजी रिलीझ होणार होता आणि यादरम्यान आमिर खानची टक्कर थेट ‘केजीएफ’च्या रॉकीशी होणार होती. मात्र अखेरच्या क्षणी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचे पहिले गाणे ‘कहानी’ रिलीझ झाले आहे. मात्र हे गाणे केवळ ऑडिओमध्ये आले आहे. अशा परिस्थितीत आमिर खानच्या या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढत आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा