Sunday, February 23, 2025
Home बॉलीवूड आमिर खानने घेतला चित्रपटसृष्टी सोडण्याचा निर्णय, कारण जाणून किरण राव झाली भावुक

आमिर खानने घेतला चित्रपटसृष्टी सोडण्याचा निर्णय, कारण जाणून किरण राव झाली भावुक

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात त्याच्या आत्मनिरीक्षण मूडबद्दल सांगितले, जे तो आता काही वर्षांपासून करत आहे. आमिर खान म्हणाला की, इतरांप्रमाणेच त्यानेही आपल्या आयुष्यात खूप काही गमावले आहे, परंतु कोरोना महामारीच्या काळात त्यानेही खूप काही मिळवले आहे. गेल्या वर्षी आमिर पत्नी किरण रावपासून वेगळा झाला होता. त्याच वेळी, त्याने कबूल केले की गेल्या दोन वर्षांच्या कारकिर्दीत एक वेळ आली, जेव्हा त्याने चित्रपट सोडण्याचा विचार केला, कारण त्याचा त्याच्या वैयक्तिक जीवनावर परिणाम होत होता.

आमिर खानने खुलासा केला की, त्याने बॉलिवूड सोडण्याचा विचार केला कारण त्याला समजले की, तो आपली सर्व शक्ती त्याच्या कामात घालवत आहे आणि आपल्या कुटुंबासह, विशेषत: त्याच्या मुलांसोबत पुरेसा वेळ घालवत नाही. तो म्हणाला की, “जेव्हा मी अभिनेता झालो तेव्हा मी माझ्या कुटुंबाला गृहीत धरले आणि तो माझ्यासोबत आहे असा विचार करून मी प्रेक्षकांची मने जिंकण्याच्या प्रवासाला निघालो. जेव्हा तुम्ही तुमच्या करिअरची सुरुवात करता तेव्हा तुम्हाला खूप काम करावे लागते, पण मी ३० -३५ वर्षे असच काम करत होतो, त्यामुळे मी माझ्या कुटुंबाला वेळ देऊ शकलो नाही.

तो म्हणाला की, “मी स्वार्थी आहे आणि फक्त माझाच विचार करत आहे. मी माझ्या मुलांसोबत होतो, पण मला जसा असायला हवा होता तसा नाही. मला आता वयाच्या ५६-५७ व्या वर्षी हे कळले आहे. पण चांगलं कारण वयाच्या ८६ व्या वर्षी हे लक्षात आलं असतं तर मी काहीच करू शकलो नसतो. सध्या मी ते दुरुस्त करू शकतो. पण सगळ्यात मोठी अडचण ही आहे की, माझ्या मुलांना काय हवंय याची मला कल्पना नाही.”

तो म्हणाला की, “सिनेमाने मला माझ्या कुटुंबापासून दूर नेले असे मला वाटले. मी माझ्या कुटुंबीयांना सांगितले की, मी यापुढे अभिनय करणार नाही आणि चित्रपट निर्मिती करणार नाही आणि तुमच्यासोबत राहीन. हे कळताच माझ्या कुटुंबीयांना धक्का बसला. मी सुरुवातीला सिनेमा सोडण्याच्या माझ्या कल्पनेबद्दल न बोलण्याचा निर्णय घेतला कारण मला विश्वास होता की काही लोक हा माझा पुढचा चित्रपट ‘लाल सिंग चड्ढा’ च्या प्रमोशनचा एक मार्ग मानतील.” खान म्हणाला की, “त्यावेळी माझ्या मुलांनी आणि किरणजींनी मला समजावून सांगितले की मी चुकीचे करत आहे. किरण खूप भावूक झाल्या आणि म्हणाला की, माझ्यात चित्रपट राहतात. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत माझ्यासोबत खूप काही घडले, मी बॉलीवूड सोडले आणि मग मी परत आले.”.

आमिर खान म्हणाला की, “गेल्या दोन वर्षांत मला विचार करायला खूप वेळ मिळाला, मी खूप आत्मपरीक्षण केले. वयाच्या १८ व्या वर्षी मी माझ्या काकांसोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करायला सुरुवात केली. त्याचबरोबर आता मी दारू पिणे बंद केले आहे. अभिनेत्याने उघड केले की, त्याला त्याच्या मुलांची स्वप्ने, आशा, काळजी आणि भीती माहित नव्हती, परंतु आशुतोष गोवारीकर आणि राजू हिरानी सारख्या चित्रपट निर्मात्यांबद्दल त्याच गोष्टी माहित होत्या.” यावरून तो आपल्या कुटुंबाला योग्य वेळ देत नसल्याचे समोर आले. त्याच्या या निर्णयाने त्याच्या कुटुंबियांना जरी आनंद झाला असला तरी देखील त्याच्या चाहत्यांना मात्र चांगलेच वाईट वाटले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

किंग खानचा ‘नाद’ फोटो तुफान व्हायरल! म्हणून शाहरूख आजही आहे लाखो दिल की धडकन

The Kashmir Files| केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली चित्रपटावर प्रतिक्रिया, साधला काँग्रेसवर निशाणा

India’s Got Talent | स्पर्धकाने जॉन अब्राहमवर फोडली काचेची बाटली, संतापलेल्या अभिनेत्याने…

 

 

हे देखील वाचा