‘सितारे जमीन पर’ (Sitaare Zameen Par) हा चित्रपट आधी सिनेमागृहामध्ये येणार आहे, आणि त्यानंतर युट्युबवर पाहायला मिळणार आहे. पण युट्युबवर तो फुकट नसेल आमिर खाननं (Aamir Khan) असा प्लॅन केलाय की, ज्याला चित्रपट पाहायचा आहे, त्याला त्यासाठी पैसे भरावे लागतील. यालाच पे-पर-व्यू असं म्हणतात. म्हणजे काय? तर जितक्या वेळा तुम्ही चित्रपट बघाल, तितक्या वेळा त्याचे पैसे द्यावे लागतील!
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आता आपला चित्रपट ‘सितारे जमीन पर’ यूट्यूबवर आणतोय. आधीच त्यानं ठरवलं होतं की हा चित्रपट तो कुठल्याही ओटीटीवर विकणार नाही. आता त्यानं जाहीर केलंय की हा चित्रपट यूट्यूबवर पे-पर-व्यू म्हणजे पैसे भरले की बघायला मिळणार, अशा पद्धतीने प्रदर्शित होणार आहे. १ ऑगस्टला ‘सितारे जमीन पर’ हा आमिर खानचा चित्रपट त्याच्या यूट्यूब चॅनेलवर येतोय. पण चित्रपट फुकट नाहीये पाहायचाय तर थोडेसे पैसे भरावे लागतील. जसं आपण सिनेमागृहामध्ये तिकीट काढून चित्रपट बघतो, तसंच यूट्यूबवरही पैसे देऊनच हा चित्रपट बघता येणार आहे.
29 जुलैला मुंबईत एका पत्रकार परिषदेत आमिर खाननं सांगितलं की,त्याचा चित्रपट यूट्यूबवर येणार आहे. पण तो मोफत नाहीये. चित्रपट पाहायचा असेल तर 100 रुपये भरावे लागतील.आणि जर तुम्हाला तो चित्रपट परत पाहायचा असेल, तर परत एकदा 100 रुपये द्यावे लागतील. म्हणजे सिनेमागृहामध्ये जसं तिकीट काढून चित्रपट बघतो, तसंच हे आहे. आमिर खान म्हणाला,”आपण चित्रपट पाहायला सिनेमागृहामध्ये जातो, तिकिटाचं पैसे देतो आणि मग चित्रपट पाहतो. हेच इंग्रजीत ‘पे-पर-व्यू’ म्हणतात. म्हणजे पैसे देऊन एकदा पाहायचं. तेच मी यूट्यूबवर करणार आहे. म्हणूनच मी ‘आमिर खान टॉकीज’ नावाचं यूट्यूब चॅनल सुरू केलंय”.
आमिर खान म्हणाला,”एकदा तुम्ही 100 रुपये भरले की तुम्ही ताे चित्रपट सुरू करून पुढचे 48 तास म्हणजे दोन दिवस बघू शकता.पण त्यानंतर परत बघायचं असेल,तर पुन्हा 100 रुपये भरावे लागतील”. ते स्पष्ट करत म्हणाले,”हा चित्रपट बघायच असेल तर प्रेक्षकांनी 100 रुपये द्यावे लागतील. ही एक कौटुंबिक चित्रपट आहे आणि मला वाटतं सगळ्या कुटुंबाने एकत्र बसून ती बघावी.आता जर तुमच्या घरात चार लोक असतील,तर फक्त 25 रुपये प्रति व्यक्तीमध्ये सगळ्यांनी मिळून चित्रपट बघता येईल!”
आमिर म्हणाला,”माझ्या यूट्यूब चॅनलवर ‘लगान’, ‘दंगल’, ‘पीपली लाइव्ह’, ‘जाने तू या जाने ना’ आणि ‘तारे जमीन पर’ अशा अनेक चित्रपटांना पाहता येणार आहे. काही गोष्टी तर फुकटसुद्धा पाहायला मिळणार आहेत!” ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट 20 जूनला सिनेमागृहामध्ये लागला होता.आतापर्यंत त्याने 261 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 2025 मधल्या सगळ्यात जास्त कमावणाऱ्या चित्रपटांमध्ये हा तिसऱ्या क्रमांकावर आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
२० वर्षांनी मोठ्या पडद्यावर पाहता येणार क्लासिक चित्रपट परिणीता; या तारखेला होतोय पुन्हा प्रदर्शित…