Monday, July 1, 2024

VIDEO: रवी शास्त्रींच्या या वक्तव्याने अभिनेता आमीर खान झाला नाराज, व्हिडिओ होतोय व्हायरल

अभिनेता आमीर खान (Aamir Khan) सध्या त्याच्या आगामी ‘लालसिंग चड्ढा’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. आमीर खानच्या या आगामी चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. या चित्रपटासाठी आमीर खान चांगलीच मेहनत घेताना दिसत आहे. तो त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये कोणतीही कसर सोडत नाहीये. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आमीर वेगवेगळे उपक्रमही आखले आहेत. यामध्ये या पॉडकास्टची सुरुवात करण्यापासून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाच्या म्युझिक अल्बमबद्दलही उत्सुकता निर्माण झाली आहे.

अभिनेता आमीर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. मिस्टर परफेक्शनिस्टसोबत या चित्रपटात करीना कपूर खान आणि मोना सिंग यांच्याही भूमिका आहेत. आमिरचा हा चित्रपट 11 ऑगस्ट 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती आमिर खान, किरण राव आणि वायाकॉम 18 स्टुडिओने केली आहे. त्याआधी नुकताच आमिर खानचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो क्रिकेट खेळताना दिसत होता. या व्हिडिओमध्ये आमिर खान क्रिकेट खेळताना “आयपीएलमध्ये संधी आहे का?” असे विचारताना दिसत आहे.  त्यानंतर स्टार स्पोर्ट्सने आपल्या सोशल मीडियावर आमिर खानसाठी एक प्रतिक्रियेचा  व्हिडिओ अपलोड केला होता.

या व्हिडिओमध्ये, चॅनलच्या एका न्यूज अँकरने रवी शास्त्रीला विचारले की आमिर खानला आगामी आयपीएल लीगमध्ये संधी आहे का, ज्यावर माजी भारतीय क्रिकेट प्रशिक्षक रवी शास्त्रीने, “तो नेटमध्ये चांगला दिसतो. त्याच्या फूटवर्कवर थोडा वेळ घालवावा लागेल, पण त्याला कोणत्याही संघात संधी मिळेल.” असे उत्तर दिल्याचे दिसत आहे.रवी शास्त्रीच्या उत्तरानंतर आमिर खानने त्याच्या सोशल मीडियावर एक मजेदार व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये त्याने मजेशीर उत्तर दिल्याचे दिसून आले आहे.

व्हिडिओमध्ये, आमिर खान त्याच्या विनोदबुद्धीचा वापर करून म्हणतो, “रवी, मी थोडा निराश आहे, कारण तुला माझे फूटवर्क आवडले नाही. माझा अंदाज आहे की तुम्ही लगान पाहिला नसेल. आता पुन्हा माझ्याकडे पहा. मला वाटते की मी ज्या संघात असेल तो प्रत्येक संघ भाग्यवान असेल. असे म्हणत जोरदार उत्तर दिले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा