Friday, November 22, 2024
Home बॉलीवूड ‘पत्नीचा खर्च उचलण्याइतके पैसे नाहीत म्हणून….’, पुनरागमन करत आमिर खानचा भाऊ फैसल खानने केले खुलासे

‘पत्नीचा खर्च उचलण्याइतके पैसे नाहीत म्हणून….’, पुनरागमन करत आमिर खानचा भाऊ फैसल खानने केले खुलासे

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या आपल्या ‘लालसिंग चड्ढा’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याच दरम्यान अलीकडेच आमिर खानने पत्नी किरण रावपासून घटस्फोट घेतला आहे. तर दुसरीकडे आमिर खानचा भाऊ फैसल खानसुद्धा त्याच्या ‘फॅक्टरी’ या कमबॅक चित्रपटाद्वारे दिग्दर्शनाच्या जगात आपले पहिले पाऊल टाकणार आहे. याच दरम्यान फैसल खानची मुलाखत घेण्यात आली होती. तेव्हा त्याने सांगितले की, त्याने पुन्हा लग्न का केले नाही. त्याचबरोबर फैसलने आमिर खानसोबतच्या त्याच्या नात्याबद्दलही सांगितले आहे.

फैसल खानला जेव्हा विचारले गेले, की तू अजून लग्न का केले नाहीस, तेव्हा त्याने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “खरं तर, दुर्दैवाने, माझ्याकडे पत्नीचा खर्च उचलण्याइतके पैसे नाहीत. माझ्या खूप मैत्रिणीही नाहीत, कारण मैत्रीण असणे देखील खूप महाग आहे. बायको त्यापेक्षा महाग आहे. जर माझे चित्रपट हिट झाले तर मी मुलगी शोधायला लागेल.” (Aamir Khan’s brother Faisal Khan is making a comeback, the first step he will take as a director)

त्याचवेळी काही लोकांनी आमिर आणि किरण रावच्या घटस्फोटाबद्दल ‘खूपच कॅज्युअल’ अशी टीका केली. यावर फैसल म्हणाला की, “मी त्याला कोणताही सल्ला देऊ शकत नाही. जर माझे स्वतःचे लग्न टिकले नाही, तर मी दुसर्‍याच्या वैयक्तिक आयुष्यात लक्ष देणारा कोण आहे. त्यांना माहित आहे की त्यांच्यासाठी काय चांगले आहे.”

त्याचबरोबर आमिर आणि त्याच्या नात्याबद्दल बोलताना फैसल म्हणाला की, “आता आमच्यामध्ये सर्व काही ठीक आहे. मी आता स्वतःचे निर्णय घेतो. एक दिग्दर्शक म्हणून मी माझ्या चित्रपटात माझे सर्वोत्तम दिले आहे आणि माझ्या निर्मात्याने मला खूप मदत केली आहे. आता माझा चित्रपट कसा आहे हे देव आणि प्रेक्षक ठरवतील.”

 

अभिनेता आमिर खानने त्याचा भाऊ फैसल खानला ‘मेला’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये लॉन्च केले होते. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे फ्लॉप ठरला. फैसलने काही वर्षे आमिरच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये स्क्रिप्ट रायटर म्हणूनही काम केले आहे. पण नंतर या खऱ्या भावांच्या नात्यात दुरावा आला आणि फैसलने आमिरवर अनेक आरोप लावले होते. परंतु आता हे दोन्ही भाऊ आपापल्या मार्गावर आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अपारशक्ती खुराणा लवकरच होणार बाबा, शेअर केला पत्नीच्या डोहाळे जेवणाचा सुंदर व्हिडिओ

-‘तुम्ही मला टक लावून पाहत होता पण…’, म्हणत प्रिया बापटकडून फोटो शेअर

-बोल्ड आणि डॅशिंग! ‘दिलबर गर्ल’ नोरा फतेहीचा नवीन लूक आला समोर

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा