Wednesday, July 2, 2025
Home मराठी आरे कार शेड प्रकरणी ठाकरे सरकारने घेतलेल्या निर्णयावर कंगनाने दिली ‘ही’ प्रतिक्रीया

आरे कार शेड प्रकरणी ठाकरे सरकारने घेतलेल्या निर्णयावर कंगनाने दिली ‘ही’ प्रतिक्रीया

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेनी रविवारी मेट्रो तीन प्रकल्पाच्या कारशेड बद्दल महत्त्वाची घोषणा केली. मेट्रो तीनसाठीचे कारशेड आता आरेऐवजी कांजूरमार्ग येथे उभारण्यात येणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. “कांजूरमार्ग येथे ज्या ठिकाणी कारशेड उभारण्यात येणार आहे, ती जमीन सरकारची आहे. त्यामुळे जमिनीसाठी एक पैसाही द्यावा लागणार नाही. जनतेचा पैसा वापरण्यात येणार नाही” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

“आरेच्या जंगलात या कारशेड प्रकल्पासाठी जी इमारत बांधण्यात आली आहे, ती दुसऱ्या कामासाठी वापरण्यात येईल. जवळपास १०० कोटी रुपये खर्च झाला आहे, तो पैसा वाया जाणार नाही” अशी ग्वाही त्यांनी दिली. “सरकारने यापूर्वी आरेतील ६०० एकर जमीन जंगल म्हणून घोषित केली होती. पण आता मी ८०० एकर जमीन जंगल म्हणून घोषित करत आहे. इथे स्थायिक असलेल्या आदिवासींच्या पाडयांवर कुठलीही गदा येणार नाही. आरेच्या जंगलातील जैवविविधतेचे रक्षण करणे आवश्यक आहे” असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

आरेमध्ये कारशेड होऊ नये यासाठी अनेक बॉलीवूड सितारेही रस्त्यावर उतरले होते. आता यावर बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौटनेही प्रतिक्रीया दिली आहे. “पहिली गोष्ट ही आहे की जगातील काही फँन्सी ऍक्टिविस्टची समस्य़ा ही काही मुंबईची समस्या नाही. गेल्यावर्षी मी एक लाख झाडे लावली आहेत. झाडे तोडने नक्कीच चांगलं नाही परंतू केवळ केवळ शक्तिशाली व श्रीमंताच्या अजेंड्यासाठी शहरीकरण रोकने हे देखील योग्य नाही. यामुळे प्रश्न सुटणार नसून समस्या वाढणार आहे,” असे तीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

https://twitter.com/KanganaTeam/status/1315251393469517824

सोशल मीडियावर कंगनाचा ट्विट व्हायरल होत आहे. अनेक चाहत्यांनी कंगनाच्या या ट्विटवर प्रतिक्रीया दिली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारीच सांगितले होते की आरे बचाव आंदोलनात ज्यांच्यावर केसेस दाखल झाल्यात त्या मागे घेण्यात येतील.

हे देखील वाचा