गायिका आस्था गिल (Aastha Gill) तिच्या गाण्यांनी नेहमीच चाहत्यांमध्ये धुमाकूळ घालत असते. आस्था सोशल मीडियावर देखील बरीच सक्रिय आहे. अलीकडेच तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. यातील खास आणि विशेष गोष्ट म्हणजे, तिने हा फोटो टॉयलेटमध्ये काढला आहे. आस्थाने कमोडच्या सीटवर बसून बॉस पोझ देत, फोटो क्लिक केला आहे. या फोटोमध्ये आस्था गिल निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. हा फोटो पाहून अनेकजण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. आस्थाच्या या फोटोवर अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या. गायिकेचा हा फोटो पाहून नेटकऱ्यांना हसू आवरणं कठीण झालंय.
नेटकरी देऊ लागले ‘अशा’ प्रतिक्रिया
मिनी स्कर्ट आणि निळ्या रंगाच्या शॉर्ट जॅकेटमध्ये, अशाप्रकारे कमोडवर बसलेल्या आस्था गिलला पाहून नेटकऱ्यांनी तिची खिल्ली उडवायला सुरुवात केली. अनेक युजर्स गायिकेची खिल्ली उडवताना दिसले, तर काहींनी आस्थाला फटकारले देखील. एका युजरने लिहिले, “अरे किमान टॉयलेट तरी सोडायचं.” एक म्हणाला, “कमाल आहे, कुठेही सुरू होतात.” तर एकाने हसत लिहिले, “हा परफेक्ट क्लिक आहे. मी पण ट्रॉय करीन.” आणखी एकाने राग दाखवत लिहिले, “यार, हे काय कृत्य आहे?” (aastha gill wearing a blue bold dress photoshoot done sitting on the commode)
आस्था गिल प्रतिभावान कलाकार आहे, जी गायन आणि डान्सव्यतिरिक्त ऍक्शनच्या बाबतीतही मागे नाही. आपल्या प्रत्येक गाण्याला हिट बनवणारी आस्था गिल कलर्स टीव्हीच्या साहसी रियॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी सीझन ११’मध्ये देखील दिसली आहे. या शोमध्ये रॅपर आस्था एक मजबूत स्पर्धक म्हणून समोर आली होती. मात्र ती हा शो जिंकू शकली नाही आणि लवकरच बाहेर पडली.
आस्था गिलने आतापर्यंत सर्व हिट गाणी दिली आहेत. बादशाहसोबतची तिची अनेक गाणी हिट झाली आहेत. आस्था गिलने ‘डीजे वाले बाबू’, ‘नागिन’, ‘कमरिया’, ‘दिलबर-दिलबर’, ‘सॅटर्डे-सॅटर्डे’ सारखी गाणी गायली आहेत.
- ‘या’ मोठ्या अभिनेत्रींच्या ब्रेस्टमध्ये झाली होती टेनिस बॉल एवढी मोठी गाठ, सर्जरी झाल्यानंतर शेअर केला फोटो
- ‘मैने प्यार किया’ फेम अभिनेत्री भाग्यश्रीने शेअर केला ३३ वर्ष जुना फोटो म्हणाली, ‘माझा विश्वास बसत नाही…
- इंडियाज गॉट टॅलेटमधील दिव्यांश आणि मनुराज यांच्या परफॉर्मन्सने रोहित शेट्टी झाला प्रभावित, थेट दिली सिनेमाची ऑफर