Wednesday, June 26, 2024

आणखी काय हवं! वीकेंड का वारमध्ये सलमानने सॅंटा बनून दिली ‘ही’ अनाेखी भेट

छाेट्या पडद्यावरील वादग्रस्त शाे ‘बिग बॉस 16‘ दिवसेंदिवस अधिकच मनोरंजक होत आहे. घरातील स्पर्धकांनी आठवड्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत केलेल्या सर्व कारनाम्यांचा हिशाेब घेण्यासाठी सलमान खान वीकेंड का वार एपिसोडमध्ये येतो, पण यावेळी वीकेंड का वार एपिसोडमध्ये सलमान खान घरातील सदस्य आणि प्रेक्षकांसाठी सॅंटा म्हणून सरप्राईज घेऊन येत आहे. हे सरप्राईज असाच एक स्पर्धक आहे ज्याला सीझनच्या सुरुवातीपासूनच लोकांकडून खूप प्रेम मिळाले. मात्र, काहीदिवसांपूर्वी त्याला शोमधून बाहेर काढले होते. काेण आहे हा स्पर्धक? चला जाणून घेऊया…

माध्यमातील वृत्तांमध्ये असा दावा केला जात आहे की, प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळालेला अब्दू रोजिक (abdu rozik) बिग बाॅसच्या घरात परतला आहे. वृत्तांमध्ये असेही म्हटले जात आहे की, अब्दू सध्या बिग बाॅसच्या घरातच आहे आणि संपूर्ण जगाला ‘वीकेंड का वार’ या एपिसोडमध्ये छोटे भाईजानची झलक पाहायला मिळणार आहे. अब्दूला पाहून कुटुंबीयांना खूप आनंद झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अब्दुच्या या एन्ट्रीमागे एक ट्विस्ट देखील आहे.

रिपोर्ट्समध्ये असेही सांगितले जात आहे की, तो काही दिवसांसाठीच शोमध्ये आला आहे. कामाच्या कमिटमेंटमुळे त्याला जानेवारी महिन्यातच शो सोडावा लागणार आहे. मात्र, अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. आता या वीकेंडच्या वारमध्ये अब्दु पाहायला मिळणार की नाही हे पाहण्यासारखे असेल.

बिग बॉसच्या आदेशानुसार अब्दू रोजिकला घर सोडावे लागले. कारण, साजिद खानने त्याची खिल्ली उडवत त्याच्या पाठीवर चुकीच्या गोष्टीही लिहिल्या होत्या, ज्यामुळे भाईजान चांगलाच संतापला होता. तेव्हापासून अब्दूचे चाहते सतत त्याची शोमध्ये परतण्याची मागणी करत होते. हे वृत्त खरे ठरले तर चाहत्यांची इच्छा पूर्ण होईल आणि अब्दू बिग बाॅसच्या घरात परत येईल.(abdu rozik to reenter bigg boss house in weekend ka war episode but leave in january due work commitment)

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कैकला सत्यनारायन अंतिमक्षणी दर्शनास पोहोचले चिरंजीवी आणि पवण कल्यान, भावूक करणारे फोटो व्हायरल

तेलगू चित्रपटसृष्टीतील दिग्गज कैकला सत्यनारायण यांचे निधन, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक

हे देखील वाचा