Wednesday, June 26, 2024

किशोर दावर प्रभावित होते अभिजीत भट्टाचार्य, तर ‘या’ कारणामुळे शाहरुख खानसाठी गाणं केलं होतं बंद

आपल्या दमदार आवाजासाठी प्रसिद्ध असलेल्या अभिजीत भट्टाचार्य यांनी ‘वादा रहा सनम’, ‘ओले ओले’, ‘जरा सा झूम लूं में’ आणि ‘झांझरिया’ सारखी गाणी गाऊन, प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या ‘तेरे बिना’ अल्बममधील गाण्यांनी प्रेक्षकांवर जादू केली होती. अभिजीत भट्टाचार्य रविवार (30 ऑक्टोबर) आपला 64 वा वाढदिवस साजरा करत आहेत.

त्यांचे वडील धीरेंद्रनाथ भट्टाचार्य हे पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील रहिवासी होते. चार भावांमध्ये अभिजीत सर्वात लहान आहेत. त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण कानपूरमध्ये घेतले. यानंतर 1981 साली ते गायनात नशीब आजमावण्यासाठी मुंबईत आले.

‘मुझे इंसाफ चाहिये’ या बॉलिवूड चित्रपटात 1983 मध्ये अभिजीत यांना आशा भोसलेसोबत ‘प्रेम दूत आया’ गाण्याची संधी मिळाली. मिथुन स्टारर या गाण्यात त्यांनी किशोर कुमार स्टाईलमध्ये गाणे गायले, जे प्रेक्षकांना आवडले आणि त्यानंतर त्यांची अशी गाडी सुसाट धावू लागली की, त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. पुढे त्यांनी इंडस्ट्रीला एकापेक्षा एक रोमँटिक हिट्स दिले.

अभिजीत यांनी 1 हजाराहून अधिक चित्रपटांमध्ये 6 हजारहून अधिक गाणी गायली आहेत. दिवंगत बॉलिवूड गायक किशोर कुमार हे अभिजीत यांच्यावर खूप प्रभावित होते. त्यांनी स्वतःच्या आवाजात किशोर कुमारची शेकडो गाणी गायली आणि रिमेक केली आहेत.

अभिजीतन यांनी बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानसाठीही अनेक गाणी गायली आहेत. एक काळ असा होता की, ते शाहरुख खानचा आवाज बनले होते. डुप्लिकेट, ‘अशोका’ आणि ‘ओम शांती ओम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी शाहरुख खानसाठी रोमँटिक गाणी गायली. पण ‘मैं हूं ना’ चित्रपटानंतर, ‘ओम शांती ओम’मध्ये क्रेडिट लिस्टच्या शेवटी नाव न घेतल्याबद्दल शाहरुख खानचा त्यांना राग आला आणि त्यांनी शाहरुखसाठी गाणे गायला बंद केले.

अभिजीत यांनी 2009 मध्ये आलेल्या ‘बिल्लू’ चित्रपटासाठी ‘खुदाया खैर’ हे गाणे गायले होते. अभिजीत यांनी निर्मात्यांना नकार दिल्याने हे गाणे चित्रित झाले नाही. यानंतर, हे गाणे दुसऱ्या व्हर्जनमध्ये दुसर्‍या गायकाने गायले.

अभिजीत यांनी अल्बमने अनेक बिगर फिल्मी पॉप संगीत अल्बम रेकॉर्ड केले आहेत. 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला त्यांनी ‘मैं दीवाना हूं’ आणि ‘टपोरी नंबर 1’ हे दोन अल्बम प्रदर्शित केले. नंतर त्यांनी ‘आशिकी’ लॉन्च केला. 2003 मध्ये त्यांनी एक पॉप अल्बम लाँच केला, जो त्या वर्षी सुपरहिट ठरला होता.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही नक्की वाचा-
रकूल प्रित सिंगचा सोशल मीडियवर कहर! गोल्डन घागऱ्यात फुलले सौंदर्य,
बॉलिवूडमधील ‘हा’ दिग्गज आहे अनन्या पांडेचा गुरू, म्हणाली ‘माझा प्रत्येक चित्रपट…’

हे देखील वाचा