Wednesday, June 26, 2024

अभिजीत बिचुकलेने दिलाय तब्बल ६ तास किसिंग सीन, बिग बॉसमधील ‘या’ स्पर्धकाने केला धक्कादायक खुलासा

कलर्स वाहिनीवरील ‘बिग बॉस १५’ कार्यक्रम सध्या जोरदार चर्चेत आहे. रोज नवनवीन वाद यामध्ये पाहायला मिळत असतात. आता या कार्यक्रमाचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये एका टास्क दरम्यान प्रत्येक स्पर्धक आपल्या इतर स्पर्धकांबद्दल अशी माहिती सांगणार आहे, जे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. यामध्ये तेजस्वी प्रकाशने कार्यक्रमातील सतत चर्चेत असणाऱ्या अभिजीत बिचुकलेबद्दल असा काही खुलासा केलाय ज्याने प्रत्येकाला धक्का बसला. काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊ.

‘बिग बॉस १५’ मध्ये सर्वाधिक चर्चा होतेय ती अभिजीत बिचुकलेची. कार्यक्रमाच्या विजेतेपदाचा दावेदार म्हणून त्याच्या नावाची चर्चा होत नसली, तरी आपल्या खोडकर आणि विचित्र स्वभावाने तो सर्वांच लक्ष वेधून घेत असतो. या व्हायरल होत असलेल्या प्रोमोमध्येही तेजस्वी प्रकाशने अभिजीत बिचुकलेबद्दल असा काही खुलासा केलाय, जो ऐकुन तुमच्याही पाया खालची जमिन सरकेल.

या प्रोमोमध्ये पर्दाफाश रिपोर्टिंग नावाचा मजेशीर टास्क दाखवला आहे, ज्यामध्ये कार्यक्रमातील प्रत्येक स्पर्धक इतर स्पर्धकांबद्दल अचंबित करणारे खुलासे करताना दिसत आहेत. याचवेळी तेजस्वी प्रकाशने हा धक्कादायक खुलासा केला आहे. ती म्हणाली की, अभिजीत बिचुकलेने एका गाण्याच्या व्हिडिओसाठी तब्बल ६ तास किसिंग सीन केला होता. हा खुलासा ऐकून प्रत्येकजण थक्क झाल्याच दिसत आहे.

https://www.instagram.com/tv/CYwnV3dqjXH/?utm_source=ig_web_copy_link

याचबरोबर या प्रोमोमध्ये काही पत्रकारही दिसत आहेत. जे घरातील सदस्यांना अनेक प्रश्न विचारत आहेत. यावेळी ही रश्मी देसाईने अभिजीतवर महिलांबद्दल याचे विचार घाणेरडे असून, महिलांसमोर तो टॉवेल खोलतो, पप्पी मागतो असे धक्कादायक आरोप केले आहेत. हे आरोप ऐकून अभिजीत बिचुकले प्रचंड चिडतो आणि रश्मीवर प्रतिमा खराब करत असल्याचा आरोप करतो. यावर रश्मी त्याला वेडा म्हणते, तर उत्तर देताना अभिजीत तिला तुझा सगळा परिवार वेडा आहे अस म्हणतो. सोबतच तो कार्यक्रमात सहभागी झालेल्या पाहुण्यांशी हुज्जत घालू लागतो, त्यावेळी संतापलेल्या सलमान खानने त्याला गप्प राहण्याचा इशारा केला.

या टास्क दरम्यान देवोलीनाने राखी सावंतबद्दल खुलासा करताना तिने २ दिवस जेलमध्ये घालवल्याचा चकित करणारा खुलासा केला. थोडक्यात या प्रोमो बघून हा एपिसोड चांगलाच गाजणार असल्याच दिसत आहे. म्हणूनच हा व्हिडिओ आत्तापर्यंत १३ हजारपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.

हेही वाचा :

‘वयाच्या चाळीशीत प्रेम मिळणं ही नॉर्मल गोष्ट’ मलायकाच्या ‘या’ पोस्टने वेधले सर्वांचे लक्ष

नागराज मंजुळे नव्या भूमिकेत येणार प्रेक्षकांच्या समोर, आगामी वेबसिरीजचा ट्रेलर प्रदर्शित

जाणून घ्या खेसारी लाल यादवच्या ‘दो घूंट’ गाण्यातील अभिनेत्रीबद्दल, जिने तिच्या बोल्ड आणि मादक अदांनी लावली सगळीकडेच आग 

 

हे देखील वाचा