आपले बिघडलेले नाते वाचविण्याचा प्रयत्न करणारी ‘ही’ जोडी ठरलीय बिग बॉसची सर्वोत्कृष्ट जोडी


भांडणे, शिवागीळ, प्रेम प्रकरणे अशा अनेक घटनांमुळे बिग बॉस हा कार्यक्रम नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. बिग बॉसच्या प्रत्येक पर्वात आपण पाहिलं आहे की, काही जोड्यांचे प्रेम हे बीग बॉसच्या घरात फुलते. अगदी उदाहरणच द्यायचे झाल्यास पवित्रा पुनिया आणि एजाज खान यांचेच प्रेमप्रकरण घ्या ना. त्यानंतर अली गोनी आणि जैस्मिन भसीन यांच्यातील मैत्रीच्या नात्याला प्रेमाचे नाव दिले गेले होते. तर तिसरीकडे पहिल्या दिवसापासून एकत्र असलेल्या रुबिना दिलाइक आणि अभिनव शुक्ला यांच्या जोडीने तर लाखो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते.

याच  जोड्यांपैकी रुबिना दिलाइक आणि अभिनव शुक्लाला  बिग बॉसच्या घरात आपल्या उत्तम खेळीमुळे व आपले बिघडलेले नाते वाचविण्यासाठी प्रयत्न केल्यामुळे सोशल मीडियावर देखील तितकेच लोक पसंत केले जात आहे. अलीकडेच त्यांना बिग बॉस १४ च्या पर्वाची सर्वोत्कृष्ट जोडीची पोहचपावती देण्यात आली. हे समजताच अभिनव खुश तर झालाच पण थोडा भावुक देखील झाला.

ही पदवी जिंकल्यानंतर अभिनव याने आपल्या इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली, ज्यात तो भावनात्मक दृष्टिकोनातून व्यक्त झाला. तो म्हणाला की, ” माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणींसोबत आमचे संबंध अधिक दृढ होत गेले. प्रत्येक विकेंडमध्ये होणारे युद्ध यांच्यामुळे आम्हाला अधिक बळ मिळाले आणि त्यामुळेच आम्ही एकमेकांच्या अधिक जवळ आलो. आमच्या दोघांचे वैशिष्ट्य म्हणजे आम्ही दोघेही हार मानण्यास तयार नव्हतो, दोघांनीही पडल्यावर पुन्हा उठण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच आम्ही आज इथवर पोहोचलो आहे.”

रुबिना हिने आपला पती अभिनव शुक्ला याच्यासोबतच बिग बॉसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांचे वैवाहिक आयुष्य चांगले नव्हते, परंतु बिग बॉसच्या घरात एकमेकांसोबत वेळ घालवल्यानंतर ते एकमेकांना समजू लागले. आणि त्यांच्या प्रेमाची केमिस्ट्री अधिकच दृढ होत गेली.

‘बिग बॉस १४’ कोण जिंकणार याची चर्चा अत्यंत जोर धरून लागली आहे. या पर्वाची सर्वोत्तम खेळाडू म्हणून रुबिना दिलाईककडे पाहिले जात आहे. कारण सर्वात जास्त प्रेक्षकांची पसंती तिला जात आहे. त्यानंतर राहुल वैद्य देखील यात रुबिनाला टक्कर देऊ शकतो. त्यामुळे रविवारी हा बिग बॉस १४ च्या पर्वाचा शेवटचा आठवडा असून प्रत्येक स्पर्धक स्वतःला या खेळात झोकून देण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे या पर्वाचा विजेता नक्की कोण होईल याकडे सर्वाचे अधिकच लक्ष लागले आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.