Thursday, July 18, 2024

ऐश्वर्याच्या धमाकेदार गाण्यावर केला अभिषेकने भन्नाट डान्स, व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan)  बऱ्याच दिवसांनी चित्रपटात झळकणार दिसणार आहे. सध्या त्याच्या दसवींं चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. तुषार जलोटा दिग्दर्शित दसवी चित्रपटात अभिषेक बच्चनसोबत निम्रत कौर,शिवम रॉय असे अनेक दिग्गज कलाकार झळकणार आहेत. सध्या अभिषेक बच्चन या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. याचनिमित्ताने इंडियाज गॉट टॅलेंटमध्ये गेलेला अभिषेक पत्नी ऐश्वर्याच्या गाण्यावर डान्स करतानाचा एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. ज्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

याबाबत संपुर्ण माहिती अशी की, बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन सध्या त्याच्या आगामी ‘दासवी’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. हा चित्रपट ७ एप्रिल रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणार आहे. त्याआधी अभिषेकने चित्रपटाचे प्रमोशन सुरू केले आहे. अलीकडेच हा अभिनेता सोनी टीव्हीच्या ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या रिअॅलिटी शोमध्ये पोहोचला होता, जिथे त्याने खूप धमाल केली होती, इतकेच नाही तर त्याने या कार्यक्रमात परिक्षक किरण खेर आणि शिल्पा शेट्टीसोबत डान्सही केला होता. सोनी टीव्हीने त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर या डान्सचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये अभिषेक किरण खेरसोबत डान्स करताना दिसत आहे, तर शिल्पानेही तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती तिच्या सुपरहिट गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे.

सोनीने त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, अभिषेक बच्चन किरण खेरसोबत त्याची पत्नी ऐश्वर्या रायच्या ‘कजरा रे’ या सदाबहार गाण्यावर नाचताना दिसत आहे. यादरम्यान किरण खेरही या गाण्यावर थिकरताना दिसत आहे, ‘बंटी और बबली’ मधील ‘कजरा रे’ या सुपरहिट गाण्यात अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यासोबत अमिताभ बच्चन देखील दिसले होते. बच्चन कुटूंबातील या तिघांनी केलेला हा डान्स आजही चर्चा होत असते. या गाण्याने त्या काळात तरुणाईला वेड लावले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा