Monday, June 9, 2025
Home बॉलीवूड अभिषेक बच्चन ऐश्वर्या आणि आराध्यासह पोहचला पॅरिसमध्ये, पहिला व्हिडिओ शेअर करत म्हणाला ‘चमकणारे पॅरिस’

अभिषेक बच्चन ऐश्वर्या आणि आराध्यासह पोहचला पॅरिसमध्ये, पहिला व्हिडिओ शेअर करत म्हणाला ‘चमकणारे पॅरिस’

 

कलाकरांना त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ मिळणे खूपच अवघड असते. कलाकार सतत एकामागोमाग एक चित्रपटांच्या शूटिंगमध्ये बिझी असतात. या शूटिंगच्या वेळापत्रकामुळे त्यांना त्यांच्या कुटुंबाला वेळ देणे देखील शक्य नसते. अशा वेळेस जेव्हा जेव्हा कलाकरांना मोकळा वेळ मिळतो तेव्हा ते कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी परिवारासोबत कुठेतरी जाऊन सुट्ट्यांचा आनंद घेतात. सध्या हा आनंद जुनिअर बच्चन आणि त्याचे कुटुंब घेत आहे.

नुकतेच अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन हे त्यांच्या मुलीसोबत आराध्यासोबत क्वालिटी वेळ घालवण्यासाठी पॅरिसला गेले आहे. या सुट्ट्यांचा पहिला व्हिडिओ अभिषेकने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रात्रीच्या वेळेस आकर्षक रोषणाईने उजळून निघालेले आयफेल टॉवर दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना अभिषेकने लिहिले, “जेव्हा पॅरिस चमकते.”

दोन दिवसांपूर्वीच अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्य बच्चन हे मुंबई एयरपोर्टवर दिसले होते. जवळपास दोन वर्षांनी हे तिघे एकत्र कोणत्याही आंतरराष्ट्रीय ट्रीपवर जात आहे. मुंबई एयरपोर्टवर अभिषेक आराध्याचा हात धरून चालताना दिसला. त्याच्या हाताला पट्टी देखील बांधलेली दिसली. ऑगस्ट महिन्यात चेन्नईमध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगच्या सेटवर अभिषेकला दुखापत झाली आणि त्याच्या हाताला लागले. त्याने सोशल मीडियावर या अपघाताची माहिती दिली होती. प्राप्त माहितीनुसार ऐश्वर्या पॅरिसमध्ये एका फॅशन शोमध्ये सहभाग घेण्यासाठी जात आहे. इथे ती लॉरियल ब्रँडला रीप्रिंझेन्ट करणार आहे.

Photo Courtesy Instagrambachhan

अभिषेक बच्चनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास तो लवकरच बॉब बिस्वास’ वर आधारित चित्रपटात दिसणार असून, हा सिनेमा शाहरुख खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट बॅनरमध्ये तयार होत आहे. याशिवाय तो ‘दसवी’ सिनेमात आणि ऐश्वर्यासोबत ‘गुलाबजामून’ सिनेमात दिसणार आहे. त्याचा ओटीटीवर ‘द बिग बुल’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता, त्याला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. तर ऐश्वर्याबद्दल सांगायचे झाल्यास, ती मणिरत्नम यांच्या ‘पोन्नियिन सेलवन’ या सिनेमात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मोठी बातमी! शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला कोर्टाने दिली एक दिवसाची एनसीबी कस्टडी

-क्रूझ ड्रग्ज पार्टीत शाहरुख खानच्या मुलाला घेऊन जाणारा अरबाज मर्चंट आहे तरी कोण?

-‘माझ्या मुलाने माझ्यासारखं न वागता…’, तर शाहरुखला आर्यनकडून होत्या ‘अशा’ विचित्र अपेक्षा

 

 

 

हे देखील वाचा