Wednesday, July 3, 2024

‘मी एक सुरक्षित व्यक्ती असून मला माझ्या पत्नीवर…’ अभिषेक बच्चनने सांगितले पतिपत्नीच्या सुखी नात्याचे रहस्य

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय ही बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय जोडी आहे. लग्नाच्या अनेक वर्षानंतर देखील त्यांची क्रेझ कायम आहे. त्यांच्यात असणारा समजुदारपणा पाहून नेहमीच त्यांच्या नात्याचा इतरांना हेवा वाटत असतो. लग्नानंतर अनेकदा पत्नीवर सासरच्यांकडून किंवा ती स्वतःहून काही बंधन लावून घेते. असे काही अभिषेकने कधी ऐश्वर्याच्या बाबतीत केले का? त्याने तिच्यावर काही बंधन लावली आहेत का असा एक प्रश्न त्याला मुलाखतीदरम्यान विचारला गेला होता. यावर अभिषेकने मनमोकळे उत्तर दिले.

Photo Courtesy: Instagram/bachchan

काही काळापूर्वी अभिषेकने दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याला विचारले गेले की, त्याने कधी पत्नीवर काही बंधन लादली आहेत का? यावर तो म्हणाला, “असे केवळ तीच व्यक्ती करू शकते जिला असुरक्षित वाटते आणि जिचा आपल्या पत्नीवर विश्वास नाही. मात्र मी एक सुरक्षित व्यक्ती आहे. मला माझ्या पत्नीवर पूर्ण विश्वास आहे. मग मला का कोणता त्रास जाणवेल. आणि फक्त पत्नीचं का जेव्हा एक पुरुष त्याच्या आईवर, बहिणीवर बंधन लादतो, किंवा त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा एकत्र त्याला असुरक्षित वाटत असते, नाहीतर त्याचा त्यांच्यावर विश्वास नसतो. मात्र मला माझ्या घरातून असे संस्कार नाही मिळाले. माझी आई स्वतः एक अभिनेत्री होती आणि तिने नेहमीच तिचे काम केले.” पुढे त्यांना विचारले गेले की, “‘कान’ फिल्म फेस्टिवलमध्ये पत्नीसोबत चालताना कसे वाटते?” यावर तो म्हणाला, “मला असे विचारणे किंवा वागणे रूढीवादी वाटते.”

याबद्दलच बोलताना अभिषेक म्हणाला, “याचा अर्थ मी पती आहे, माझ्या पत्नीसोबत कसे काय चालू शकतो? तुम्ही कधी ऐश्वर्याला विचारले आहे का की, माझ्या चित्रपटांच्या प्रीमियरला ती माझ्यासोबत रेड कार्पेटर का चालते? ती माझ्या सर्वच कार्यक्रमांमध्ये सामील असते. मात्र मी तिच्यासोबत नाही जाऊ शकत. असे का? हे पूर्णतः चुकीचे आहे. जर माझी पत्नी माझे समर्थन करते तर मी देखील किंबहुना माझे ते कर्तव्यच आहे की मी देखील तिचे समर्थन करावे?”

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
आईच्या निधनानंतर रडताना दिसली राखी सावंत; म्हणाली, ‘माझं लग्न धोक्यात…’

अमृता अरोरा चेहरा लपवत पार्टीतून पडली बाहेर; युजर्स ट्राेल करत म्हणाले, ‘तोंड लपवावे…’

हे देखील वाचा