नेपोटिझमबाबतच्या चर्चांना चांगलेच उधान आले आहे. बॉलिवूडमध्ये काही अभिनेत्यांना त्यांच्या वडिलांचा पाठिंबा असल्यामुळे त्यांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री मिळाल्याचे म्हटले जाते. असेच काहीसे दिग्गज अभिनेता अभिषेक बच्चनवरही त्याचे वडील महानायक अमिताभ बच्चन यांचा हात असल्याचे ऐकायला मिळाले आहे. परंतु असे असले तरीही अभिषेकने अशा गोष्टींना दूर लोटले आहे. त्याने नेपोटिझमबाबत मौन सोडले असून मोठे वक्तव्य केले आहे.
तो म्हणाला की, तुमची कारकीर्द ही प्रेक्षकांवर अवलंबून असते. चाहते तुमच्या कामाची प्रशंसा करत असतील किंवा तुम्हाला पसंत करत असतील, तर तुमच्या कारकीर्दीत मोलाची भर पडते. अभिषेकने २००० मध्ये रिफ्यूजी या चित्रपटातून पदार्पण केले होते. त्याला या इंडस्ट्रीमध्ये आता २० वर्षे झाली आहेत.
नेपोटिझमच्या आरोपावर अभिषेक बच्चनचे वक्तव्य
नेपोटिझमच्या आरोपावर अभिषेकने म्हटले की, “माझ्या वडिलांनी माझ्यासाठी कधीच कोणाशी चर्चा केली नाही. त्यांनी माझ्यासाठी कधीच चित्रपट बनवला नाही.” अभिषेकने आपल्या वडिलांसाठी ‘पा’ चित्रपट प्रोड्यूस केला होता. त्यात स्वत: अमिताभ बच्चन आणि विद्या बालन यांनी काम केले होते. नेपोटिझमबाबत अनेक वेळा अभिषेक बच्चनची तुलना अमिताभ बच्चन यांच्याशी होते. सोबतच आरोप लावण्यात आले की, अभिषेकच्या मागे त्याचे वडील अमिताभ बच्चन यांचा हात राहिला आहे.
तो म्हणाला की, “लोकांना समजले पाहिजे की फिल्म इंडस्ट्री एकप्रकारे बिझनेस आहे. पहिल्या चित्रपटानंतर जर तुमचे काम आवडले नाही, तर तुम्हाला पसंत केले जात नाही. त्यावेळी तुम्हाला पुन्हा काम मिळण्याची शक्यता खूप कमी होते. हेच या इंडस्ट्रीचे कटू सत्य आहे.”
पुढे बोलताना अभिषेक म्हणाला, “मला माहिती आहे की जेव्हा माझे चित्रपट चालत नाहीत, तेव्हा समजते की कोणत्या चित्रपटांमध्ये मला रिप्लेस केले जात आहे. तुमचे काम कोणाला आवडले नाही, तर ते पुन्हा तुमच्यावर जोखीम घेत नाहीत.”
बॉब बिस्वासची शूटिंग आहे बाकी
शाहरुख खानच्या रेड चिली निर्मित अभिषेकचा पुढील चित्रपट ‘बॉब बिस्वास’ची शूटिंग अद्याप बाकी आहे. यापूर्वी अजय देवगण निर्मित बनत असलेला चित्रपट ‘द बिग बुल’चे कामही तो काही दिवसांमध्ये पूर्ण करेल. लॉकडाऊननंतर अभिषेक पहिल्यांदाच कोणत्याही चित्रपटाच्या शूटिंगसाठी आपल्या घराबाहेर पडला आहे.
वाचा- Bigg Boss 14: नेपोटिझमबाबत प्रश्न झाले उपस्थित; सलमान खानने दिले शाहरुखचे उदाहरण, म्हणाला…