Wednesday, July 3, 2024

सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्ननांनतर ‘हे’ कपलही बांधणार साता जन्माच्या गाठी, गोवामध्ये थाटामाटात पार पडणार विवाहसोहळा

सध्या मनोरंज क्षेत्रामध्ये लग्नसराई सुरु झाली आहे. 2022 प्रमानेच यावर्षी देखिल अनेक कपल आपल्या नात्याला लग्नबंधनात अडकवत आहेत. नुकतंच आथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटर केएल राहुल यांनी थाटामाटात लग्नसोहळा उरकला. तर बॉलिवूडमधील प्रसिद्ध फॅशन डिझायनर आणि अभिनेत्री मसाबा गुप्ता आणि तिचा बॉयफ्रेंड सत्यदीप मिश्रा यांनीही गुपचुप लग्न करुन अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला. तर ‘शेरशाह‘ कपल म्हणजेच कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे कपलही लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. अशताच बॉलिवूडमधी प्रसिद्ध अभिनेत्री देखिल (दि, 9 फ्रेब्रुवारी) रोजी लग्नाच्या पवित्र धाग्यात बांधली जाणार आहे.

चित्रपट ‘खुदा हाफिज’ (Khuda Hafiz) फेम प्रसिद्ध अभिनेत्री शिवालिका ओबेरॉय (Shivaleeka Oberoi)हिने देखिल तिचा बॉयफ्रेंड अभिषेक पाठक सोबत (दि, 9 फ्रेब्रुवारी) रोजी विवाह बंधनात अडकणार आहे. हे दोघे अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. सध्या लग्नाचा सिजन असल्यामुळे या कपलनेही लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

अभिषेक पाठक (Abhishek Pathak) हा बॉलिवूड इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध दिग्दर्शक असून त्याने नुकतंच ‘दृष्यम 2‘ चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर धुमाकुळ घातला होता. त्याशिवाय अभिषेकने सुरुवातीला ‘प्यार का पंचनामा‘, ‘उजड़ा चमन’ सारख्या चित्रपटांची निर्मीती केली होती. अभिषेक हा चित्रपट नर्माता कुमार मंगत (Kumar Mangat) यांचा मुलगा आहे. शिवालिका हिचा जन्म (दि, 24 फेब्रुवारी 1995) साली झाला होता. तिने ग्रॅजवेशन पुर्ण केल्यानंतर असिस्टंट डारेक्टर म्हणूनही काम केलं हेतं. त्यावेळी तिने ‘हाउसफुल 3‘ सारख्या चित्रपटामध्येही असिस्टंट डारेक्टर म्हणून काम केलं होतं.

 

View this post on Instagram

 

शिवालिकाने 2019 साली ‘ये साली आशिकी‘ चित्रपटामधून अभिनयक्षेत्रामध्ये पाउल ठेवलं होतं. यानंतर तिने अभिनेता विद्युत जामवाल सोबत 2020 साली ‘खुदा हाफिज‘ चित्रपटामधून तिला खरी ओळख मिळाली. शिवालिका आणि अभिनेषेक यांची पहिली भेट काही दिवसांपूर्वीच झाली आणि आता त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी अभिनेत्रीचं नाव कर्म राजपाल याच्यासोबतही जोडलं होतं.

माध्यनमातील वृत्तानुसर अभिनषेक आणि शिवालिका यांच्या लग्नाचे सर्व कार्यक्रम गोवामध्ये 8 फेब्रुवारी रोजी सुरु होणार आहेत. येत्या 9 फेब्रवारी रोजी हे कपल विवाह बंधनात अडकणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सिद्धार्थ आणि कियारा यांच्या लग्नाच्या तारखेत बदल, ६ फेब्रुवारी ऐवजी ‘या’ दिवशी कपल अडकणार विवाहबंधनात
साडी म्हणजे दर्जा…! श्रिया सरनचा साडीवर इथिनिक लूक, पाहाचा फोटो गॅलरी

हे देखील वाचा