नुकताच सर्वत्र करवाचौथचा सण धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. सगळेजण चंद्र येणाची वाट पाहत होते आणि अशावेळी अभिनेता अभिषेकने आपली पत्नी ऐश्वर्याला सरप्राइज दिले. तो या दिवसांमध्ये ‘ब्रीद : इनटू द शॅडो’ची शूटिंग दिल्लीमध्ये करत आहे, तसेच कोणाला माहिती नव्हते की, तो अचानक दिल्लीमधील शूटिंग सोडून आपल्या घरी येईल. यावेळी बिग बी अमिताभ यांनी मुलाच्या या सरप्राइजनंतर सून ऐश्वर्या, नात आराध्या आणि पत्नी जया बच्चन यांची प्रतिक्रिया यावेळी कशी होती? हे आपल्या ब्लॉगमध्ये सांगितले आहे.
अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये खुलासा केला आहे. ‘करवाचौथ हा सण कुटूंबासोबत साज केला जातो. या दिवशी पत्नी आपल्या पतींसाठी पूर्ण दिवस उपवास ठेवते, आणि त्यांच्या दिर्घायूसाठी प्रार्थना करते. यादिवशी सकाळी आणि रात्री पुजा करतात. नंतर स्वतःहा तयार होऊन चाळणीमध्ये दिवा ठेवून आधी चंद्राला बघून मग पतीला बघितले जाते. पतीच्या हाताने पाणी पिऊन धरलेला उपवास सोडला जातो.’
पुढे अमितजींनी लिहिले की, ‘यावेळीस चंद्र खूप मोठा आला होता, नाहीतर चंद्र हा ढगाआड लपलेला असतो. परंतु आज ( २४ ऑक्टोबर) अर्धा चंद्र आला होता, तसेच अमिताभ यांनी लिहिले की, अभिषेकने ऐश्वर्याला सरप्राइज दिले. तो दिल्लीमध्ये ‘ब्रीदची’ शूटिंग सोडून अचानकपणे कोणाला न सांगता घरी आला. त्याला असे अचानक पाहून घरचे खूपच आश्चर्यचकित झाले, आणि आनंदाने जोर जोरात ओरडायला लागले. यानंतर सगळे जण तयार झाले, घरात एक आनंदाचे वातावरण होते. जेवणाचा टेबलही शानदार जेवणाने भरलेला होता.
अमेझॉन प्राईमने काही दिवसांपूर्वी ‘ब्रीद’च्या दुसऱ्या सीजनची घोषणा केली होती. या चित्रपटात अभिषेक आणि अमित साद हे दोघेजण अनुक्रमे पुन्हा एकदा अविनाश सबरवाल आणि इंस्पेक्टर कबीर सावंत यांची भूमिका साकारणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘हा तर तोंडावरूनच गुंड वाटतो’, म्हणत पूनम सिन्हा यांच्या आईने नाकारले होते शत्रुघ्न यांचे स्थळ
-जॉन अब्राहमच्या ‘सत्यमेव जयते २’ चित्रपटाचे पोस्टर रिलीझ, प्रदर्शनाची तारीखही जाहीर