Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

ईशा गुप्ताने बाथरूममध्ये काढला ‘असा’ मिरर सेल्फी, पाहून नेटकऱ्यांनाही फुटला घाम

बॉलिवूड अभिनेत्री अनेकदा हॉटनेसच्या बाबतीत मर्यादा ओलांडताना दिसत असतात. अभिनयाव्यतिरिक्त, त्यांचा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना आश्चर्यचकित आणि घायाळ करण्यासाठी पुरेसा असतो. भारताची ऍंजेलिना जोली पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांची धडधड वाढवण्यासाठी आली आहे. ती आपल्या हॉट अंदाजाने सोशल मीडियावर आग लावत आहे.

बाथरूममध्ये दाखवला हॉट अंदाज
ईशा गुप्ता जिला देसी ऍंजेलिना जोली असे म्हणतात. अलीकडेच, तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर असा फोटो शेअर केला आहे की, जे पाहून अनेकांचे  डोळे उघडेच राहिले. बाथरूममध्ये जाऊन तिने असा सेल्फी काढला आहे की, कोणत्याही चाहत्याने पाहताच त्याचा घाम गळू शकतो. तिने आपला टी-शर्ट वर घेतला आणि मग अशी पोझ दिली की, तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

चाहते म्हणाले, ‘देसी ऍंजेलिना जोली’
ईशा तिच्या बोल्ड फोटोंमुळे अनेकदा चर्चेत असते. सोशल मीडियावर ईशाचे फोटो खूप धमाल करतात. ईशाने ‘जन्नत २’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ती ‘राज ३’ चित्रपटात दिसली. ईशाचा बोल्ड अवतार पाहून महेश भट्टने तिला भारताची ऍंजेलिना जोली हे नाव दिले. तेव्हापासून तिला भारताची ऍंजेलिना म्हटले जाऊ लागले. ऍंजेलिना एक प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेत्री आहे.

झाली होती ट्रोल
आज ईशाच्या सौंदर्याबद्दल सर्वत्र चर्चा होत असते. पण एक काळ असा होता, जेव्हा तिच्या काळ्या रंगामुळे तिला खूप ट्रोल केले जात होते. तिने एका मुलाखतीत सांगितले होते की, “जेव्हा मी बॉलिवूडमध्ये आले होते, त्यावेळी काही बॉलिवूड स्टार्स ज्यांच्यासोबत मी आजपर्यंत काम केले नाही त्यांनी सांगितले की, तू ना तुझा मेकअप काळा केला आहे, तू थोडा गोरा कर.” ईशा या सगळ्या टोमण्यांमुळे तुटली पण कालांतराने तिने तिचे व्यक्तिमत्व खूप मजबूत केले.

ईशा गुप्ताने केलेल्या वेब सीरीज

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ईशा गुप्ता टीव्ही मालिका ‘नकाब’ चा भाग बनली आहे. यामध्ये मल्लिका शेरावत देखील तिच्यासोबत दिसली होती. ईशा या मालिकेत एका पोलिसाची भूमिका साकारत होती. ईशा ‘जन्नत २’, ‘रुस्तम’, ‘कमांडो २’ आणि ‘बादशाहो’ चित्रपटांमध्ये दिसली होती. ती चित्रपटांपेक्षा सोशल मीडियावर जास्त सक्रिय असते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ईशा गुप्ताने बोल्ड फोटो शेअर करताच नेटकऱ्यांकडून प्रश्नांचा भडिमार; म्हणाले, ‘कपडे नव्हते का?’

-बोल्डनेसचा कहर, ईशा गुप्ताने बाल्कनीमध्ये उभे राहून केले टॉपलेस फोटोशूट

-“देखो.. मगर प्यार से” म्हणणाऱ्या ईशा गुप्ताने शेअर केला तिचा ग्लॅमरस फोटो

हे देखील वाचा