Monday, July 8, 2024

वरुण धवनच्या देखण्या लूकवर फिमेल चाहत्या झाल्या फिदा, म्हणाल्या ‘जीव घेता का’

वरुण धवन हा हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. आपल्या दमदार अभिनयाने त्याने हिंदी चित्रपट जगतात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. वरुणने अनेक दमदार चित्रपटात काम केले आहे. सध्या त्याच्या एका फोटोची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. बॉलिवूडचा देखणा अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) त्याच्या चित्रपटा इतकाच सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो आणि त्याचे अनेक फोटो पोस्ट करत असतो.

वरुणच्या प्रत्येक फोटोची सोशल मीडियावर चर्चा होत असते. वरुण ने पुन्हा एकदा त्याच्या इंस्टाग्रामवरून नवीन हॅण्डसम लूकचा फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत त्याने ‘आँखों की गुस्ताखियां’ असे मजेशीर कॅप्शन दिले आहे . वरुण धवनच्या फॅन फॉलोइंगची यादीही खूप मोठी आहे, हे कॅप्शन मिळाल्यानंतर चाहते एकामागून एक कमेंट करत आहेत. सध्या त्याच्या या पोस्टची सगळीकडे चर्चा रंगली आहे.

या व्हायरल फोटो मध्ये त्याने पिवळा टी-शर्ट घातला असून तो पुढे झुकून पोज देताना दिसत आहे. यासोबत आपला फोटो शेअर करताना त्याने सलमान खानच्या ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटातील गाणे निवडले आहे. त्याने कॅप्शनमध्ये ‘आँखों की गुस्ताखियां’ असे लिहले आहे. या फोटोवर चाहते जोरदार कमेंट करताना दिसत आहेत. अवघ्या काही तासांत वरुणच्या या पोस्टवर 24 हजारांहून अधिक लाईक्स आले आहेत.

त्याच्या कमेंटला उत्तर देताना एका चाहत्याने, ‘अलेक्सा ऐसे ना मुझे तुम देखो गाणे लाव असे म्हणले आहे. त्याचप्रमाणे आणखी एका चाहत्याने “जीव घेता का?”  असे म्हणत या फोटोचे कौतुक केले आहे. त्याचप्रमाणे इतर अनेक चाहतेही एकापाठोपाठ एक कमेंट करत आहेत. कोणी त्याला सर्वात हँडसम म्हणत आहेत तर कोणी खूप हॉट म्हणत आहेत.

दरम्यान वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर वरुण धवन लवकरच ‘भेडिया’ या चित्रपटात दिसणार आहे. दिनेश विजन निर्मित भेडिया हा कॉमेडी हॉरर चित्रपट आहे. या चित्रपटात वरुणच्या विरुद्ध अभिनेत्री क्रिती सेनन दिसणार आहे. याआधी ही जोडी रोहित शेट्टीच्या ‘दिलवाले’मध्ये दिसली होती. रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट यावर्षी 25 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूकही रिलीज करण्यात आला होता, ज्यामध्ये मोहक दिसणारा वरुण धवन खूपच भयानक लूकमध्ये दिसत होता. अलीकडेच वरुणनेही भेडियाच्या संपूर्ण टीमसोबत जोरदार होळी खेळली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा