Saturday, June 29, 2024

‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटाची शूटिंग पूर्ण, चक्क १०० ठिकाणी झालीय शूटिंग

अभिनेता आमिर खानचे सर्व चित्रपट हे हिट होतात. कारण त्याच्या प्रत्येक चित्रपटाची कथा ही काहीतरी वेगळा संदेश देणारी असते. सध्या प्रेक्षकांना ऍक्शन आणि ड्रामा असलेले चित्रपट पाहण्यापेक्षा सामाजिक संदेश देणारे चित्रपट जास्त आवडतात. अशात आमिर खान आणि करीना कपूर खान अभिनित ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाच्या शूटिंगचे काम पूर्ण झाले.

शूटिंगचे काम पूर्ण झाल्याने संपूर्ण टीमने याचा आनंद साजरा केला आहे. ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’चा रिमेक आहे. या चित्रपटाने सहा वेळा अकादमी पुरस्कार जिंकला आहे. पुन्हा एकदा या चित्रपटामधील कथा नवीन पद्धतीने पाहायला मिळणार म्हणून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. चाहते यामध्ये आमिर आणि करीनाला एकत्र पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

एकूण १०० ठिकाणी झाली आहे शूटिंग
नुकतेच या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्याने सेटवर सर्वजण आनंद व्यक्त करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. साल २०२० मध्ये या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करण्यात आली होती. तेव्हापासून आतापर्यंत या चित्रपटामध्ये १०० ठिकाणांवरचे सीन शूट केले आहेत.

नाताळच्या मुहूर्तावर चित्रपट होणार प्रदर्शित
‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट नाताळच्या मुहूर्तावर एक दिवस आधी म्हणजेच २४ डिसेंबर, २०२१ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री करीना कपूर खान मुख्य भूमिकेमध्ये आहेत. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वैत चंदन यांनी केले आहे. चित्रपटामध्ये प्रीतम यांचे मधुर संगीत ऐकायला मिळणार आहे. एरिक रोथ आणि अतुल कुलकर्णी यांनी याची कथा लिहिली आहे. या चित्रपटाची निर्मिती आमिर खान प्रोडक्शन, वायाकॉम १८ स्टुडिओ आणि पॅरामाउंट पिक्चर्स यांनी केली आहे. चित्रपटामध्ये नागा चैतन देखील एक प्रमुख पात्र साकारताना दिसणार आहे. कॉमेडी-ड्रामाने भरलेला हा चित्रपट असून यामध्ये देखील एक सामाजिक संदेश दडलेला आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-उर्मिला मातोंडकरने सांगितला गणेश उत्सवाचा अनुभव; म्हणाली, ‘आम्ही कोकणातील आमच्या घरी…’

-‘लय भारी’ तेजस्विनीच्या मराठमोळ्या सौंदर्याची सर्वांनाच भुरळ, पदरावरील ‘त्या’ श्लोकाने वेधले खास लक्ष

-‘दिसला गं बाई दिसला’, म्हणणाऱ्या ‘राजा राणीची गं जोडी’ फेम संजूचा गावरान अवतार भावला नेटकऱ्यांना

हे देखील वाचा