बॉलिवूडचा ‘मिस्टर पर्फेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जाणाऱ्या आमिर खानचा भाऊ फैजल खान सध्या आपल्या ‘फॅक्ट्री’ या नवीन चित्रपटामुळे चर्चेत आहे. मात्र, याव्यतिरिक्त तो आणखी एका कारणामुळे भलताच चर्चेत आला आहे, ते म्हणजे त्याचा वडापाव खातानाच्या व्हिडिओमुळे होय. फैजल रस्त्याच्या कडेला एका छोट्याश्या दुकानासमोर उभे राहून वडापाव खाताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण हैराण झाले आहेत आणि प्रत्येकाच्या हैराणीचे कारण वेगवेगळे आहे.
सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत फैजल आमिर खानच्या ‘पीके’ या चित्रपटातील अवतारात दिसत आहे. त्याने खांद्यावर एक साईड बॅग टांगली आहे. हातात ग्लोव्हज आहेत आणि तो वडापाव खातानाचा आस्वाद घेत आहे. त्याचा हा व्हिडिओ पाहून नेटकरी त्याला “क्यूट,” म्हणत आहेत. तसेच “तारे जमीन पर,” असे म्हणत त्याच्या साधेपणाची प्रशंसा करत आहेत. याव्यतिरिक्त काहीजण त्याच्यावर टीकाही करत आहेत. (Actor Aamir Khan Brother Faisal Khan Spotted Eating Wada Pav Near His Residence In Bandra)
खरं तर तो ग्लोव्हज परिधान करून वडापाव खात आहे आणि त्यानंतर दुकानदाराचा शर्ट शिवत आहे. तसेच त्याच हाताने वडापाव खाताना दिसत आहे. त्यामुळे नेटकरी यावर कमेंट्स म्हणत आहेत की, “ग्लोव्हजवर व्हायरस लागत नाही का?”
एकाने तर त्याला स्वस्त आमिर खान म्हटले आहे. तसेच दुसऱ्या एकाने तर आमिर खानवर निशाणा साधत म्हटले आहे की, “तो (फैजल) स्टार आहे. आमिर खानने त्याचे आयुष्य बर्बाद केले आहे.”
फैजल खानने मागील काही दिवसांपूर्वीच आपल्या ‘फॅक्ट्री’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. या चित्रपटात फैजल स्वत: मुख्य भूमिकेत आहे. त्याचबरोबर त्याने या चित्रपटातून आपल्या दिग्दर्शनाच्या कारकिर्दीची सुरुवातही केली आहे. हा चित्रपट पुढील महिन्यात म्हणजेच ३ सप्टेंबर, २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे.
फैजल चित्रपटसृष्टीत यशस्वी झाला नाही. मात्र, त्याने ‘मेला’, ‘चिनार दास्तान’, ‘जो जीता वही सिकंदर’मध्ये कॉलेजमधील विद्यार्थ्याच्या भूमिकेत काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-एका वर्षानंतर अचानक सक्रिय झाले सुशांतचे फेसबुक अकाऊंट; चाहते म्हणाले, ‘काश तू जीवंत असता…’
-अभिनेत्री लीजा हेडनने शेअर केले मुलीला स्तनपान करतानाचे फोटो; पोस्टवर उमटतायेत जोरदार प्रतिक्रिया