Tuesday, July 9, 2024

आमिर खानची लाडकी लेक आयरा डिप्रेशननंतर करतेय नवीन समस्यांचा सामना; म्हणाली, ‘…तोपर्यंत फक्त रडत राहिले’

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान अनेकदा तिच्या चाहत्यांसोबत सोशल मीडियावर संवाद साधताना दिसते. आयरा खान बॉलिवूडपासून दूर असली, तरी ती प्रसिद्धीपासून कधीच दूर राहिली नाही. आयरा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. अलीकडेच तिने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात तिने डिप्रेशनसंदर्भात माहिती दिली आहे.

आयराने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिने सांगितले आहे की, तिच्या डॉक्टरांनी तिचे औषध बदलले होते. त्यानंतर तिची प्रकृती ठीक नाही. तिला खूप रागही येऊ लागला आहे. पूर्वी तिच्या बाबतीत असे घडत नव्हते. आता आयरा म्हणाली की, ती तिच्या मानसोपचार तज्ञाशी या विषयावर बोलण्याचा विचार करत आहे.

आयराने इंस्टाग्राम अकाऊंटवर १० मिनिटांपेक्षा जास्त वेळाचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ती तिच्या तब्येतीबद्दल बोलताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये आयराने सांगितले की, तिला गेल्या काही दिवसांपासून खूप राग येत आहे. परंतु सहसा तिच्यासोबत असे होत नाही. तिला कसे सामोरे जावे हे देखील समजत नाही. दुसरीकडे, आयराचे डॉक्टर म्हणतात की, राग औषधांशी संबंधित नाही.

आयरा पुढे सांगते की, ड्रायव्हिंग केल्यानंतर ती शुक्रवारी घरी जात होती, पण ती तसे करू शकली नाही. त्यानंतर ती फुटबॉल खेळायला गेली आणि तिथेही ती लक्ष केंद्रित करू शकली नाही. परिस्थिती आणखी वाईट झाली. जेव्हा ती गाडी चालवत होती, तेव्हा तिला समजले की, तिला राग येत आहे आणि ती गाडी चालवण्याच्या स्थितीत नाही. त्यानंतर तिने कोणालातरी फोन केला. ती म्हणते की, “मला वाटले की अशा स्थितीत मशीनवर नियंत्रण ठेवणे योग्य नाही. म्हणून मी गाडी बाजूला लावली. जोपर्यंत कोणी मला नेण्यासाठी येत नाही, तोपर्यंत मी फक्त रडत राहिले.” २०२० मध्येच आयरा खानने ती डिप्रेशनमध्ये असल्याचे उघड केले होते.

दरम्यान, आयरा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आजकाल आयरा फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेला डेट करत आहे आणि दोघे अनेकदा त्यांच्या इंस्टाग्राम लाईव्ह सेशनमध्ये एकत्र वर्कआऊट करताना दिसतात. आजकाल आमिर खान त्याच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात करीना कपूर खान, नागा चैतन्य आणि मोना सिंग यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट ख्रिसमस २०२१ ला प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-गर्ल गँगसोबत जंगलात फिरताना, नदीत डुबकी मारताना दिसली जान्हवी कपूर, व्हिडिओ आणि फोटो व्हायरल

-‘गोडसे’ वादाच्या भोवऱ्यात! ‘कोण आहेत महेश मांजरेकर?’, म्हणत गृहनिर्माण मंत्र्यांनी ओढले अस्तित्वावर ताशेरे

-मुंबई- दिल्ली संघातील सामन्याचा निकाल शरद केळकरच्या लागला जिव्हारी; फोटो पाहून तुम्हालाही कळेल त्याचं दु:ख

हे देखील वाचा