Friday, July 5, 2024

जेव्हा रिक्षा चालकाने आमिरसमोरच फाडले होते त्याच्या चित्रपटाचे पोस्टर, मग पुढे जे झाले…

अभिनेता आमिर खान चित्रपटाच्या सुरुवातीला त्याच्या क्युटनेसमुळे ओळखला जायचा. त्याची क्युटनेस, ऍक्शन आणि सामाजिक संदेश यांनी परिपूर्ण असे चित्रपट रसिक प्रेक्षक खूप आवडीने पाहतात. त्याच्या चित्रपटांमधील कहाण्या प्रेक्षकांना खूप आवडतात. तसेच त्याचा अभिनय देखील विलक्षणीय असतो. त्याने साल १९९८ मध्ये त्याचा नवीन चित्रपट ‘कयामत से कयामत तक’ आला होता. या चित्रपटामध्ये त्याच्या अभिनयाने यशाची मोठी झेप घेतली. चित्रपटातील अभिनय पाहून चाहते भारावून गेले होते. तसेच या चित्रपटामध्ये त्याच्याबरोबर जुही चावलाने अभिनय केला होता.

या चित्रपटामधूनच त्याला खूप प्रसिद्धी मिळाली. एका रात्रीतच तो स्टार झाला. कष्टाचं फळं म्हणतात ते हेच. कारण आमिरने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली होती. या चित्रपटामध्ये तो सिनेसृष्टीत अगदी नवखाच होता. चित्रपटाचे बजेट खूप कमी असल्याने, त्याच्या प्रमोशनची जबाबदारी त्याने स्वतःवर घेतली होती. यावेळी त्याच्याबरोबर एक असा प्रसंग घडला होता जो ऐकून तुम्ही देखील व्याकुळ व्हाल. (Actor Aamir Khan had put up poster’s on auto for the promotion of this movie)

स्वतः रस्त्यावर फिरत केले चित्रपटाचे प्रमोशन
‘कयामत से कयामत तक’ हा चित्रपट आमिरच्या आयुष्यातील महत्वपूर्ण चित्रपट ठरला. बजेट कमी असल्याने त्याने ठरवले की, आपण सर्वांनी मिळून चित्रपटाचे प्रमोशन करायचे. त्यामुळे तो आपल्या काही मित्रांसह मुंबईमध्ये रोज रात्री चित्रपटाचे पोस्टर रिक्षा आणि टॅक्सीच्या मागे चिटकवत होता. तसेच तेथील रिक्षा चालकांना तो कळकळीने सांगायचा की, “मी या चित्रपटाचा अभिनेता आहे. कृपया माझा हा चित्रपट नक्की पाहा.” असे करत करत त्याने चित्रपटाचे प्रमोशन केले.

रिक्षा चालकाने फाडले चित्रपटाचे पोस्टर
आमिर त्याचा चित्रपट लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी खूप धडपड करत होता. रात्रीचे प्रमोशन करत असताना एक दिवस त्याच्याबरोबर वाईट प्रसंग घडला. त्याने एका रिक्षावर पोस्टर लावले. ते त्या रिक्षा चालकाला आवडले नाही. तो अभिनेत्याजवळ आला आणि त्याला ओरडू लागला. त्याच्या रागाचे रूपांतर भांडणात होत असल्याचे पाहून आमिरने त्याची क्षमा मागितली. परंतु रिक्षा चालकाला राग एवढा अनावर झाला होता की, त्याने अभिनेत्यसामोरच त्याच्या चित्रपटाचे पोस्टर फाडून टाकले. या घटनेने आमिर खूप दुःखी झाला होता.

खूप कमी लोकांना माहित आहे की, आमिरचा पहिला चित्रपट ‘कयामत से कयामत तक’ नाही, तर ‘होली’ हा होता. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेकडे प्रेक्षकांचे फारसे लक्ष गेले नाही. परंतु ‘कयामत से कयामत तक’मध्ये त्याने दमदार बाजी मारली. त्याने स्वतः चित्रपटाचे प्रमोशन केल्याने चाहत्यांना ही गोष्ट फार भावली आणि सर्वांनी त्याच्या चित्रपटाला मोठी गर्दी केली.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कोणी म्हणतंय ‘रावणाचा ड्रेस’, तर कोणी ‘पक्षीराज’; विचित्र आउटफिटमुळे ट्रोल झाली उर्वशी

-राज कुंद्राच्या सुटकेनंतर गहना वशिष्ठने शेअर केली पोस्ट; म्हणाली, ‘तू खूप…’

-‘तो केवळ तरुण अभिनेत्रींसोबतच काम करतो’, सलमानसोबत पुन्हा काम करण्याच्या प्रश्नावर भाग्यश्रीने दिले उत्तर

हे देखील वाचा