सुपरस्टार आमिर खान याचा ‘लाल सिंग चड्ढा‘ हा सिनेमा सध्या बॉयकॉट ट्रेंडच्या भोवऱ्यात अडकलाय. रिलीझपूर्वीपासूनच वादात सापडलेल्या या सिनेमाला प्रेक्षकांना नाकारले. पहिल्या दिवसापासूनच या सिनेमाला देशभरात फार चांगला प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, असे असले, तरीही परदेशात या सिनेमाला प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे. विशेष म्हणजे, या सिनेमाने परदेशात कमाईचे विक्रम मोडले आहेत. चला तर पाहूयात आमिरच्या सिनेमाने परदेशात किती रुपये छापलेत?
माध्यमांतील वृत्तांनुसार, आमिर खान (Aamir Khan) याच्या ‘लाल सिंग चड्ढा’ (Laal Singh Chaddha) या सिनेमाने भारतात १४ दिवसांमध्ये फक्त ६० कोटींचा आकडाही पार केला नाही. दुसरीकडे, परदेशात मात्र सिनेमाने चांगलीच कमाई केली आहे. इतकेच नाही, तर या सिनेमाला परदेशात इतकी लोकप्रियता मिळत आहे की, या सिनेमाने परदेशात एक मोठा विक्रमही मोडला आहे. खरं तर, आमिरचा हा सिनेमा आता आंतरराष्ट्रीय बाजारात २०२२मध्ये सर्वाधिक कमाई करणारा हिंदी सिनेमा ठरलाय. चला जाणून घेऊया जगभरात आमिरच्या सिनेमाने किती कमाई केली आहे.
नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, या सिनेमाने १४ दिवसात देशभरात फक्त ५८.११ कोटींची कमाई केली आहे, तर दुसरीकडे परदेशात या सिनेमाने आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार ५९ कोटी रुपयांची कमाई केली आहे. इतकेच नाही, तर परदेशात कमाई करण्याच्या बाबतीत या सिनेमाने यावर्षीचे ब्लॉकबस्टर हिंदी सिनेमे ‘द काश्मीर फाईल्स’ आणि ‘भूल भुलैय्या २’ यांनाही मागे सोडले आहे. यासोबतच सिनेमाने आणखी एक कारनामा केला आहे. मोठ्या विरोधानंतरही या सिनेमाने एकूण १०० कोटी रुपयांच्या कमाईचा आकडाही पार केला आहे. आमिरच्या या सिनेमाने जगभरात तब्बल ११६ कोटी रुपये कमावत १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री केली आहे.
आमिर खानचा हा सिनेमा ११ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनच्या खास दिवशी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. या सिनेमाला हिट व्हायचे असेल, तर १८० कोटींचा आकडा पार करावा लागेल. या सिनेमाने आतापर्यंत ११६ कोटी रुपये कमावलेत. अशात १८० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाला नुकसानीपासून वाचण्यासाठी अजून ६४ कोटी रुपयांची कमाई करावी लागणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कशी नशिबाने थट्टा आज मांडली! ‘गँग्स ऑफ वासेपूर’ फेम अभिनेत्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
‘हे’ कलाकार कधीच चढणार नाही ‘कॉफी विद करण’चा उंबरा, कारण आहे खूपच गंभीर
‘इमर्जन्सी’ चित्रपटातून मिलिंद सोमण यांचा खतरनाक लूक समोर, ओळखणे होईल कठिण