Wednesday, July 3, 2024

धक्कादायक! ‘मिस्टर पर्फेक्शनिस्ट’ कोरोनाच्या विळख्यात, झालाय होम क्वारंटाईन

गेल्या काही दिवसांत बऱ्याच कलाकारांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. अशात आणखी एक बातमी समोर आली आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, बॉलिवूडचा ‘मिस्टर पर्फेक्शनिस्ट’ आमिर खानचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाच्या विळख्यात सापडल्यानंतर, आमिर खान सध्या होम क्वारंटाईन झाला आहे आणि तो कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत आहे. आमिरच्या प्रवक्त्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

आमिर खानच्या प्रवक्त्याने माध्यमांना सांगितले की, “आमिर खानची कोविड- 19 ची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ते सध्या आपल्या घरात होम-क्वारंटाईन आहेत. ते कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत आहेत आणि त्यांची तब्येत सुधारत आहे. गेल्या काही दिवसात जी लोक त्यांच्या संपर्कात आली आहेत, त्यांनी खबरदारी म्हणून त्यांची चाचणी करून घ्यावी. आपल्या चिंता आणि शुभेच्छाबद्दल सर्वांचे आभार.”

गेल्या वर्षी आमिर खानबरोबर काम करणारे 7 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले होते, त्यामध्ये त्याचे काही सुरक्षा कर्मचारी, ड्रायव्हर आणि घरी काम करणारे नोकरही सामील होते.

अलीकडेच रणबीर कपूर, संजय लीला भन्साळी, कार्तिक आर्यन, वरुण धवन, नीतू सिंग यांसारखे बॉलिवूड सेलिब्रिटीही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले.

विशेष म्हणजे, आमिर खानने 14 मार्च रोजी आपला 56 वा वाढदिवस साजरा केल्यानंतर, दुसर्‍याच दिवशी सोशल मीडिया सोडण्याची घोषणा केली होती. यामुळे चाहते थोडे निराश झाले. मात्र, मोबाईलचा अतिवापर होत असल्याचे कारण देत तो सोशल मीडियापासून लांब झाला. अलीकडेच तो ‘कोई जाने ना’ चित्रपटाच्या ‘हर फन मौला’ या गाण्यात दिसला होता. या गाण्यात तो अली अवरामसोबत थिरकताना दिसला होता, ज्याला खूप पसंत केले गेले.

याशिवाय आमिर खान ‘लाल सिंग चड्ढा’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात आमिरसोबत करीना कपूर खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच, हा चित्रपट 24 डिसेंबर 2021 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होईल. चित्रपट गेल्या वर्षी ख्रिसमसलाच प्रदर्शित होणार होता. पण कोरोना साथीच्या आजारामुळे ती तारीख पुढे ढकलण्यात आली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भल्या भल्यांना रडवणाऱ्या कंगना रणौतला ‘या’ कारणामुळे अश्रू अनावर

-कंगना रणौतच्या ‘थलायवी’चा ट्रेलर रिलीज; अभिनेत्रीच्या दणदणीत आवाजाने हबकला प्रेक्षकवर्ग

-प्रसूतीच्या एका महिन्यानंतरच कामावर परतली ‘बेबो!’ ‘पैशांसाठी हे काहीही करतील’ म्हणत नेटकऱ्यांनी केले ट्रोल

हे देखील वाचा