अभय देओल त्या बॉलिवूड स्टार्सपैकी एक आहे, जे सोशल मीडियावर खूप कमी सक्रिय असतात. त्याने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळे त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यास त्याचे चाहते उत्सुक झाले आहेत.
अभय देओलने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे. ज्यामुळे तो आता चर्चेचा विषय ठरत आहे. त्याने शेअर कलेल्या फोटोत प्रसिद्ध आर्टिस्ट शिलो शिव सुलेमान त्याच्यासोबत दिसत आहे. त्याने हा रोमँटिक फोटो शेअर केल्यापासून, सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया येत आहेत. त्याच्या लव्ह लाईफबद्दल विविध प्रकारचे अंदाजही लावले जात आहेत. या फोटोला आतापर्यंत ८१ हजारांपेक्षाही लाईक्स मिळाले आहेत.
अभयने शिलोसोबत रोमँटिक फोटो शेअर करत लिहिले की, “फ्लुड, फ्री, फ्लोइंग, क्रिएटिव्ह, फन, फियरलेस, सेंसुअल, इंस्पायरिंग, डायनामिक, टॅलेंटेड, सेक्सी.. ओह आणि या सर्व गोष्टी शिलो शिव सुलेमानमध्ये आहेत.” अभय आणि शिलोच्या या सुंदर फोटोला चाहते भरभरून प्रेम आणि प्रतिक्रियाही देत आहेत.
अभय देओलच्या एका चाहत्याने लिहिले की, “तुम्ही एक शुद्ध आत्मा आहात, माझा विश्वास आहे की, जर तुम्ही म्हणता की, ही व्यक्ती सुंदर आहे, तर तुम्ही त्या व्यक्तीचे खरे सौंदर्य पाहिले असेल. मी तुला प्रेम पाठवत आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की, मला तुम्ही एक उत्तम अभिनेता म्हणून खूप आवडता.”
अभयने शेअर केलेल्या या फोटोवर शिलोनेही कमेंट केली आहे. हे फोटो खूप पसंत केले जात आहेत. अभय देओल सोशल मीडियावर त्याच्या वैयक्तिक गोष्टी शेअर करत नाही. मात्र, त्याने शिलोसोबत पहिल्यांदा फोटो शेअर केले आहेत. यापूर्वी अभय देओल प्रीती देसाईसोबत रिलेशनशिपमध्ये होता. मात्र, ४ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघेही वेगळे झाले.
शिलो शिव सुलेमान ही एक कन्टेम्पररी आर्टिस्ट आहे. ती आपल्या इलस्ट्रेशन और इन्स्टॉलेशन आर्टसाठी लोकप्रिय आहे. शिव सुलेमान आपल्या कामात टेक्नोलॉजी आणि सामाजिक बदलाचे विषय मांडते. तिचा जन्म कर्नाटक येथे झाला होता. तिची आई निलोफर सुलेमान देखील एक लोकप्रिय पेंटर होती. शिलो शिव सुलेमानने वयाच्या १६ व्या वर्षी पुस्तकाचे इलस्ट्रेशन केले होते. लहानपणापासूनच तिच्या आईकडून प्रेरित होऊन तिने पेंटिग सुरू केली.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-रणबीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आलियाने केला रोमँटिक फोटो शेअर; मनातील भावनाही केल्या व्यक्त
-गौतमी देशपांडेच्या ऑफ शोल्डर ड्रेसमधील फोटोने अमृता खानविलकरलाही घातली भुरळ; कमेंट करत म्हणाली…