टीव्ही अभिनेत्री आणि ‘बिग बॉस १४’ची विजेती रुबीना दिलैकने २६ ऑगस्ट रोजी तिचा वाढदिवस साजरा केला. तिचा पती अभिनव शुक्लाने तिचा वाढदिवस आणखी खास बनवला. वाढदिवसाच्या वेळी दोघेही केरळला ट्रीपला गेले होते. या जोडप्याने तिथे खूप मजा केली आणि क्वालिटी टाईम घालवला. नुकतेच अभिनव शुक्लाने रुबीनाला वाढदिवसाची अविस्मरणीय भेट दिली. अभिनेत्रीने इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
व्हिडिओमध्ये रुबीना दिलैक अभिनवने भेट दिलेले आयुर्वेदिक ‘शिरोधारा’ ट्रीटमेंट करताना दिसत आहे. ‘शिरोधारा’ ही एक आयुर्वेदिक ट्रीटमेंट आहे. या ट्रीटमेंटसाठी तिने टॉवेल रोब घातलेला दिसत आहे. एका छोट्या व्हिडिओमध्ये रुबीना ‘शिरोधारा’ ट्रीटमेंटच्या फायद्यांविषयी सांगत आहे. अभिनेत्रीने सांगितले आहे की, “यामुळे चिंता कमी होते, झोप सुधारते, एकाग्रता वाढते, वृद्धत्वाचा वेग कमी होतो, डोळ्यांच्या समस्या नाहीशा होतात, रक्ताभिसरण वाढते, दीर्घकालीन मायग्रेन आणि डोकेदुखीसाठी हे फायदेशीर आहे.”
रुबीनाने या व्हिडिओसह एक छोटासा मॅसेजही लिहिला आहे. अभिनेत्रीने लिहिले की, “माझा वाढदिवस अशा प्रकारे साजरा करण्यात आला. अभिनव शुक्लाने ठरवलेच होते की, वाढदिवस खूप छान व्हावा. शांत वातावरण, क्लीन डाएट आणि आयुर्वेदिक ट्रीटमेंटमुळे माझे शरीर आणि आत्मा पुन्हा तरुण झाला आहे.” रुबीना दिलैक काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये दिसली होती. अभिनेत्रीने अलीकडेच ‘अर्ध’ चित्रपट साइन केला आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले आहे.
झी टीव्हीच्या ‘छोटी बहू’ या मालिकेतील राधिकाच्या भूमिकेमुळे रुबीना दिलैक प्रचंड प्रसिद्ध झाली. यानंतर तिने या टीव्ही सीरियलच्या सिक्वेलमध्येही तीच भूमिका केली. २०१६ मध्ये रुबीनाला ईस्टर्न आयच्या आशियाच्या टॉप ५० हॉट महिलांच्या यादीत ११ वे स्थान मिळाले. त्याच वेळी २०१७ मध्ये ती या यादीत १० व्या स्थानावर होती. कलर्स टेलिव्हिजनवर दाखवल्या जाणाऱ्या ‘शक्ती-अस्तित्व के एहसास की’ या मालिकेत रुबीना कौतुकास्पद पात्र साकारले होते.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘ये रिश्ता क्या कहलाता है’चा नैतिक करतोय त्याचा वाढदिवस साजरा, जाणून घ्या संपूर्ण कारकीर्दप्रवास
-‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’च्या सेटवर एन्जॉय करताना दिसले ‘ही मॅन’; चहा पित म्हणाले, ‘चीयर्स!’