Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘तुझी पत्नी काय विचार करेल?’, न्यूड सीन देण्यापूर्वी मराठमोळ्या राधिका आपटेने विचारला होता अभिनेत्याला प्रश्न

बॉलिवूडमध्ये बोल्ड सीन देणाऱ्या अनेक अभिनेत्रींचा समावेश आहे. यातील बऱ्याच अभिनेत्री चौकटीबाहेरील भूमिका साकारून चर्चेत आल्या आहेत. यापैकीच एक अभिनेत्री म्हणजे मराठमोळी राधिका आपटे होय. राधिकाही बोल्ड सीन देण्याच्या बाबतीत कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. राधिकाचा सन २०१५ साली प्रदर्शित झालेला ‘पार्च्ड’ सिनेमा बोल्ड विषय आणि बोल्ड सीन्ससाठी प्रसिद्ध आहे. लीना यादव यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाला क्रिटिक्सने सकारात्मक प्रतिक्रिया दिली होती. यातील राधिकाचा न्यूड सीन अनेक दिवस चर्चेत होता. या सीनमध्ये तिच्यासोबत अभिनेते आदित हुसैन होते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आदिल यांनी या चर्चित सीनबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या.

ईटाईम्सला दिलेल्या मुलाखतीत आदिल हुसैन यांनी सांगितले की, राधिका आणि त्यांनी कशाप्रकारे या सीनवर काम केले. त्यांनी हेही सांगितले की, हा सीन शूट करण्यापूर्वी राधिकासोबत त्यांची काय काय चर्चा झाली होती.

आदिल यांनी सांगितले की, “राधिकाने कलेप्रती स्वत: ला समर्पित केले आहे. लोकांनी हे समजले पाहिजे. तिच्या आणि माझ्यासारख्या व्यक्तींसाठी कला महत्त्वाची आहे, लोक काय विचार करतात हे नाही.”

“मी त्या सीनमध्ये जवळपास न्यूड (नग्न) होतो. मला अशा सीनची काहीही समस्या नाहीये. व्यक्तीच्या आयुष्यातील समस्या दर्शवण्यासाठी जर असे सीन केले जातात, तर मला त्याची काहीच अडचण नाही,” असे आपल्या न्यूड सीनबद्दल बोलताना आदिल म्हणाले. त्यांनी असेही सांगितले की, त्यांच्या पत्नीला त्यांच्या या सीनमुळे काहीच समस्या नव्हती. त्या अभिनेत्याच्या व्यावसायिक जीवनाचा आदर करतात आणि त्यांना आदिल यांच्या संवदनेवर पूर्ण विश्वास आहे.

मुलाखतीत आदिलने राधिकासोबत शूट करण्यापूर्वी केलेल्या चर्चेविषयी सांगितले. ते म्हणाले, “‘तुझा बॉयफ्रेंड काय विचार करेल?’ या प्रश्नावर राधिकाने सांगितले की, ती विवाहित आहे. यानंतर लगेच राधिकाने मला विचारले की, ‘तुमची पत्नी काय विचार करेल?’ राधिकाच्या या प्रश्नावर मी अभिनेत्रीला सांगितले की, या सीनमुळे माझ्या पत्नीला कोणतीही समस्या नाहीये. यांसारखे सीन करण्यासाठी आमच्या वैयक्तिक नात्याला कोणतीही बाधा नव्हती.”

यापूर्वीही एका मुलाखतीत राधिकाने सांगितले होते की, पार्च्डचा हा सीन त्यावेळी आला, जेव्हा त्यांना याची सर्वात आवश्यकता होता. राधिकाने एका मॅगझीनसोबत चर्चा करताना सांगितले होते की, “हे सोपे नव्हते, कारण त्यावेळी मी स्वत:च्या बॉडी इमेज समस्यांमध्ये अडकले होते. त्यामुळे स्क्रीनवर न्यूड होणे थोडे चिंताजनक होते.”

“मला अशी रोलची आवश्यकता होती, कारण जेव्हा तुम्ही बॉलिवूडमध्ये असता, तेव्हा वारंवार तुम्हाला हे सांगितले जाते की, आपल्या शरीरासोबत काय करायचे आहे. मी नेहमीच ही गोष्ट सावरली आहे की, मी आपल्या शरीर आणि चेहऱ्यासोबत काहीच करणार नाही.”

“जे वादग्रस्त फोटो समोर आले होते, ते वेगळ्या प्रकारचे फोटो होते, जे माझे नव्हते. त्या फोटोंबाबत मला नाही वाटत की, कोणाला काही केले पाहिजे. केवळ त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. जेव्हा मी पार्च्डसाठी न्यूड झाले, तेव्हा मला जाणीव झाली की, माझ्याकडे लपवण्यासाठी काहीच नाहीये.”

राधिकाने आतापर्यंत अनेक मराठी, हिंदी, तमिळ आणि तेलुगु यांसारख्या अनेक भाषिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यात ‘पॅड मॅन’, ‘लस्ट स्टोरीज’, ‘हंटर’, ‘लय भारी’, ‘तुकाराम’, ‘कबाली’, ‘मांझी’, ‘सॅक्रेड गेम्स’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. यांमध्ये काही वेबसीरिजचाही समावेश आहे.

हे देखील वाचा