Tuesday, July 9, 2024

मोठी बातमी! ड्रग्ज प्रकरणात अभिनेता एजाज खानला एनसीबीने मुंबई विमानतळावर घेतले ताब्यात, ‘या’ टोळीशी संबंध असल्याची शक्यता

चित्रपटसृष्टीतून मोठी बातमी समोर येत आहे. ड्रग्ज प्रकरणात अभिनेता एजाज खानला मंगळवारी (३० मार्च) अमली पदार्थ नियंत्रक विभाग म्हणजेच एनसीबीने ताब्यात घेतले आहे. एजाज काही दिवसांपासून शूटसाठी राजस्थानमध्ये होता. आज तो मुंबईला परतला असता विमानतळावर एनसीबी टीमने त्याला ताब्यात घेतले आहे. सध्या एनसीबीची एक टीम त्याला आपल्या ऑफिसमध्ये नेऊन चौकशी करत आहे.

एजाज ‘बिग बॉस ७’ मध्ये आपल्या सहस्पर्धकासोबत झालेल्या हाणामारीमुळे चर्चेत आला होता. यापूर्वीही त्याला सन २०१८ मध्ये अटक करण्यात आली होती.

https://twitter.com/DekhJara18/status/1376889104915398660

एनसीबीच्या सूत्रांनी सांगितल्यानुसार, एजाज खान आणि ड्रग्जचे सर्वात मोठे सिंडिकेट म्हणजेच मुंबईतील बटाटा टोळी यांच्यात दुवे सापडले आहेत. एजाजला पकडल्यानंतर एनसीबी टीम मुंबईच्या अंधेरी आणि लोखंडवाला भागात छापेमारी करत आहेत. एजाजपूर्वी मुंबईच्या सर्वात मोठ्या ड्रग सप्लायर फारुख बटाटाचा मुलगा शादाब बटाटाला शनिवारी (२७ मार्च) अटक केली होती. असे म्हटले जात आहे की, शादाबची चौकशी केल्यानंतर एजाजला ताब्यात घेतले आहे.

सन २०१८ मध्येही झाली होती अटक
एजाज खानला यापूर्वी सन २०१८ मध्येही बंदी घातलेली औषधे घेण्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांच्या नारकोटिक्स सेलने अटक केली होती. अभिनेत्याने त्यावेळी म्हटले होते की, जेव्हा त्याला अटक केली, तेव्हा तो नशेत होता. त्याच्याकडे ८ एक्सटेसी गोळ्या सापडल्या होत्या, ज्याचे वजन २.३ ग्रॅम आणि किंमत तब्बल २.२ लाख रुपये होती. यादरम्यान नवी मुंबई पोलिसांनी अभिनेत्याचा मोबाईल फोनही जप्त केला होता. जेव्हा त्याला पकडले, तेव्हा तो हॉटेलमध्ये पार्टी करत होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-दिलजीतने शेअर केला मुलासोबतचा मजेशीर व्हिडिओ, सेलेब्सनी विचारले ‘आई कुठे आहे?’

-मराठमोळी जोडी रितेश अन् जेनेलियाही रंगले होळीच्या रंगात, रोमँटिक व्हिडिओ शेअर करत दिल्या शुभेच्छा!!

-इरफान खानच्या आठवणीत मुलगा बाबिल झाला भावुक; वडिलांचे कपडे परिधान करत दिला आठवणींना उजाळा

हे देखील वाचा