Friday, April 25, 2025
Home बॉलीवूड ‘बिग बीं’चा शेजारी बनलाय ‘सिंघम’ अजय देवगण; मुंबईमध्ये खरेदी केला त्याने आलिशान बंगला

‘बिग बीं’चा शेजारी बनलाय ‘सिंघम’ अजय देवगण; मुंबईमध्ये खरेदी केला त्याने आलिशान बंगला

कोणतीही व्यक्ती असो, त्या व्यक्तीची आयुष्यात दोन स्वप्ने असतात. एक म्हणजे चांगली नोकरी आणि दुसरं म्हणजे स्वतः चं घर. फक्त सामान्य व्यक्तीच काय, तर बॉलिवूडमधील कलाकारांचे देखील हेच स्वप्न असते की, ते स्वतः च्या कमाईने त्यांचं घर घेऊ शकतील. या लॉकडाऊनच्या काळात अनेक गरिबांची नोकरी गेली आहे, तर दुसरीकडे बॉलिवूडमधील कलाकार त्यांचं स्वप्न साकार करत आहेत. अमिताभ बच्चन, अर्जुन कपूर, आलिया भट्ट, सोनाक्षी सिन्हा, सनी लिओनी या कलाकारांनंतर, आता बॉलिवूडमधील सिंघम हीरो अजय देवगण याने देखील त्याचे घर खरेदी केले आहे. तो आता अमिताभ बच्चन यांचा शेजारी बनला आहे. अलीकडेच त्याने मुंबईमध्ये एक आलिशान बंगला खरेदी केला आहे.

अजय देवगणने जे घर खरेदी केले आहे, त्याची किंमत तब्बल ६० कोटी इतकी आहे, अशी माहिती समोर आली आहे. त्याने जुहूमध्ये हे घर खरेदी केले आहे. अजय देवगणचा हा नवीन बंगला त्याचे जुने घर शिवशक्ती पासून जास्त लांब नाहीये. एका मीडिया हाऊस सोबत चर्चा करताना, अजय देवगणच्या एका प्रवक्त्याने या गोष्टीचा खुलासा केला आहे. मात्र त्याला देखील या बंगल्याच्या किमतीबद्दल जास्त माहिती नाहीये. परंतु असे म्हंटले जात आहे की, या बंगल्याची किंमत ६० कोटी इतकी आहे.

अजय देवगण आणि त्याची पत्नी काजोल हे मागच्या वर्षी पासूनच एका नवीन घराच्या शोधत होते. कपोल कोऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीने ७ मेला हा बंगला विना वीरेंद्र देवगण आणि विशाल उर्फ अजय देवगण यांच्या नावावर ट्रान्स्फर केला आहे.

अजय देवगणच्या या नवीन घराच्या शेजारी अक्षय कुमार, ऋतिक रोशन, धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन हे राहतात. अमिताभ बच्चन यांनी नुकतेच काही दिवसांपूर्वी ३१ कोटींचे एक नवीन अपार्टमेंट खरेदी केले आहे. त्यांनी डिसेंबर २०२० मध्ये ही प्रॉपर्टी खरेदी केली होती, पण एप्रिल २०२१ मध्ये या प्रॉपर्टीचे रजिस्ट्रेशन झाले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा