संपूर्ण देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा हाहाकार वाढला आहे. दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चालली आहे, रुग्णालयात बेड उपलब्ध होत नाहीयेत. सरकार देखील संपूर्ण खबरदारी घेऊन रुग्णांची काळजी घेत आहे. परंतु सोयी सुविधांचा योग्य पुरवठा न झाल्याने अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लगाला आहे. भारतातील हे संकट बघून अनेकांनी मदत केली आहे. अनेक बॉलिवूड कलाकार, राजकीय नेते आणि खेळाडूंनी देखील मदत केली आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांनी कोरोना रुग्णांसाठी 100 ऑक्सिजन कंसंतट्रेटर्स डोनट केले होते. त्यांनतर अजय देवगण आता कोरोना रुग्णांना मदत करण्यासाठी धावला आहे.
अजय देवगणने मुंबईतील 20 बेडला कोविड आयसीयू बनवण्यात मदत केली आहे. या कामासाठी त्याने त्याच्या टीम सोबतच मुंबईमधील हॉस्पिटलची मदत घेतली आहे. इंडिया टुडे या वृत्तपत्राच्या माहितीनुसार, बृहन्मुंबई मधील शिवाजी पार्क मधील एका हॉलला व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन 20 बेड कोरोना रुग्णांसाठी तयार केले आहे. या कामासाठी अजय देवगण, आनंद पंडित, बोनी कपूर, लव रंजन, समीर नायर या कलाकारांनी बीएमसी मधील स्माइली अकाऊंटमध्ये 1 कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, या कोविड आयसीयूची जबाबदारी आणि काळजी पिडी हिंदुजा रुग्णालयातील डॉक्टर्स घेणार आहे.
अजय देवगणच्या आधी देखील अनेक कलाकारांनी कोरोना रुग्णांसाठी मदत केली आहे. अक्षय कुमार आणि त्याची पत्नी ट्विंकल खन्ना यांनी 100 ऑक्सिजन कंसंतट्रेटर्स डोनेट केले आहे.तसेच किरण खेर यांनी देखील 1 कोटीची मदत केली आहे. सोनू सूदने तर मोफत कोविड सेंटर चालू केले आहे. अशा प्रकारे भारतातील ही भयावह परिस्थिती पाहता अनेक कलाकार मदत करत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-प्रियांका चोप्राला या अवतारात पाहून चाहते झाले हैराण, फोटो झाला सोशल मीडियावर व्हायरल