Monday, July 1, 2024

‘माझ्याशी लग्न करशील का?’, अभिनेत्रीचा बोल्ड लूक व्हायरल होताच चाहत्याच्या कमेंटने वेधले लक्ष

बाॅलिवूडचा लाेकप्रिय अभिनेता अजय देवगण याची मेहुणी, अभिनेत्री तनिषा मुखर्जी कायमच काेणत्या ना काेणत्या कारणांमुळे चर्चेत असते. तनिषा आज बॉलिवूड चित्रपटांपासून दूर असली, तरी चाहत्यांवर तिची जादू अजूनही कायम आहे. ती आजही तितकीच चर्चेत आहे जितकी ती तिच्या चित्रपटांदरम्यान असायची. सोशल मीडियावर तिचे असे अनेक ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओ आहेत, जे चाहत्यांच्या पसंतीस उतरतात. या सगळ्या दरम्यान तनिषाने तिच्या इंस्टाग्रामवर स्वतःचा एक मनमोहक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती अतिशय बोल्ड स्टाईलमध्ये चंदेरी रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान करताना दिसत आहे.

चाहत्याने कमेंट करत लग्नाची घातली मागणी
इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करत तनिषा मुखर्जी(Tanishaa Mukerji) हिने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘फॅशन एक वाइब आहे! याचा अनुभवा घ्या!’. व्हिडिओमध्ये तनिषाने मोकळे केस साेडले आहे, ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे. तनिषाच्या या व्हिडिओवर चाहते सतत कमेंट करत आहे. काहीजण तिला कमेंट करत ‘बॉम्ब’ म्हणत आहेत, तर अनेक जण तिला ‘किलर’ म्हणत आहेत. यासोबतच चाहते फायर, हार्ट आणि फ्लॉवर इमोजी शेअर करून आपले प्रेम व्यक्त करत आहेत. एका यूजरने तर चक्क अभिनेत्रीला कमेंट करत लग्नाची मागणी घातली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tanishaa Mukerji (@tanishaamukerji)

तनिषा मुखर्जी 44 वर्षाची असून अद्याप तिने लग्न केलेले नाही. एका मुलाखती दरम्यान लग्नाशी संबंधित प्रश्नवर उत्तर देताना तनिषा म्हणाली, “अशा प्रश्नांना टाळणंच याेग्य आहे. मात्र, मी प्रामाणिक पणे सांगायचे झाले, तर जेव्हा मी लग्न करण्याचा निर्णय घेईन तेव्हा सर्व जगासमोर याविषयी खुलेपणाने बोलेन.”

तनिषा विषयी बाेलायचे झाले, तर तिला बहिण कजाेल प्रमाणे बाॅलिवूडमध्ये अपेक्षित यश मिळाले नाही.अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम करूनही तनिषा फ्लॉप अभिनेत्री ठरली. यश मिळवण्यासाठी तिने बोल्ड होण्यासही नकार दिला नाही. मात्र, तिला यश मिळाले नाही. तनिषाने बिग बॉसच्या घरात देखील स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
‘बेवफा तुझको मैं बदनाम…’, नीलकमल सिंगची नवीन गजल रिलीज, तुम्ही पाहिली का?

करीनासाेबत कामावर गेला तिचा लाडका जेह; मायलेकाच्या जाेडीवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव

हे देखील वाचा