Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘प्रिय आकाश..I Love You..तुझी अंकिता!, परश्याने शेअर केलेल्या लव्ह लेटरची तुफान चर्चा

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, त्याचा अजिबात नेम नाही. या जगात अनेकांची नावे सारखी आहेत. यामुळे कधी कधी कलाकारांनाही वेगवेगळ्या गोष्टींचा सामना करावा लागतो. चाहते काहीही व्हायरल करून त्या गोष्टी आपल्या कलाकारांविषयी जोडण्याचा प्रयत्न करतात. काहीवेळी कलाकार यावर प्रतिक्रिया देण्याचे टाळतात, तर काहीवेळा चाहत्यांची शंका दूर करण्याचा प्रयत्न करतात. आता असेच काहीसे सर्वांचा लाडका ‘परश्या’ म्हणजेच अभिनेता आकाश ठोसरबाबत घडले. त्यानेही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांची शंका दूर केली.

झालं असं की, सोशल मीडियावर एक लव्ह लेटर जोरदार व्हायरल होत आहे. या लव्ह लेटरमधील व्यक्तीचे नाव ‘आकाश’ असे आहे. या लव्ह लेटरमध्ये लिहिले आहे की, “प्रिय आकाश, तू मला प्रपोज केला आणि तुला मी जे काही म्हटले, त्यासाठी सर्वात आधी सॉरी. नंतर मी विचार केला आणि माझं मन सांगत होतं तूच आहेस तो ज्याची मी वाट बघते. जर माझ्या आधी तुला कोण आवडत असेल, तर नाही म्हटलास तरी चालेल. तुझं माझ्यावर खरं प्रेम असेल, तर हो म्हण. माझ हृदय तुला दिलंय, तुझं हृदय मला दे, प्रेम करते तुझ्यावर एवढे तरी समजून घे, तुझी अंकिता.” (Marathi Actor Akash Thosar Clarification On The Love Letter)

या लव्ह लेटरकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. नेटकऱ्यांनी आकाश ठोसरलाच या लव्ह लेटरमधील ‘आकाश’ समजले आणि त्याला हे लव्ह लेटर पाठवू लागले. त्यामुळे आकाश ठोसरने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम स्टोरीवर हे लव्ह लेटर शेअर केले आहे. यासोबतच त्याने लिहिले आहे की, “अरे मित्रांनो तो आकाश मी नाहीये! सगळे मलाच पाठवतायेत.” या सोबतच त्याने एक स्माईल इमोजीही शेअर केला आहे.

Photo Courtesy: Instagram/akashthosar

आकाशच्या कामाबाबत बोलायचं झालं, तर त्याने नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. या चित्रपटात त्याने ‘प्रशांत काळे’ ही भूमिका साकारली होती. यामध्ये त्याला सर्वजण ‘परश्या’ या नावानेच पुकारायचे. त्यामुळे त्याला परश्या म्हणून सर्वत्र ओळखू लागले. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांनी चांगलीच दाद दिली होती. या चित्रपटातने शंभर कोटींपेक्षाही अधिक रुपयांची कमाई केली होती.

या चित्रपटानंतर आकाशने ‘फ्रेंडशिप अनलिमिटेड’, ‘लस्ट स्टोरीज’ आणि ‘१९६२: द वॉर इन द हिल्स’ यांसारख्या हिंदी तसेच मराठी चित्रपटात काम केले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मिठीत जाऊन तुझ्या मिटावे…’, स्पृहा जोशीच्या फोटोसोबत कॅप्शननेही वेधले चाहत्यांचे लक्ष

-देखणं रूप! हिरव्या बांगड्या, कपाळावर टिकली अन् पिवळी साडी नेसून राजेश्वरीने दिल्या नवरात्रीच्या शुभेच्छा

-बोल्ड ऍंड ब्यूटीफुल! सई ताम्हणकरच्या हॉटनेसने नेटकरी झाले पुरते वेडे; फोटोवर पडतोय लाईक्सचा पाऊस

हे देखील वाचा