मराठी चित्रपटसृष्टीतला पहिला बक्कळ कमाई करणारा सुपरडुपर हिट सिनेमा म्हणजे सैराट. ह्या सिनेमाने संपूर्ण चित्रपटसृष्टीला दोन उत्तम कलाकार दिले. एक तर आकाश ठोसर म्हणजे आपला लाडका परशा आणि रिंकू राजगुरू म्हणजे सर्वांची आर्ची. या सिनेमाने या दोघांना संपूर्ण जगात प्रसिद्धी मिळवून दिली. आजही आकाश परशा म्हणूनच ओळखला जातो. आकाश सैराट नंतर अनेक सिनेमे आणि वेबसिरीज करताना दिसला आहे. आकाश पुन्हा एकदा एका नव्या वेबसेरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र आता जो आकाश आपल्याला दिसणार आहे, तो पाहून तुम्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसणार आहे.
आकाश लवकरच महेश मांजरेकरांच्या ‘१९६२ – द वॉर इन द हिल्स’ या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. ही सिरीज २६ फेब्रुवारीला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. आकाश या वेबसिरीजसाठी चर्चेत तर आहेच मात्र त्यापेक्षाही जास्त तो त्याच्या या सिरीजमधल्या लुक बद्दल लक्ष वेधून घेत आहे. पिळदार शरीर, कॉन्फिडन्ट बॉडीलँग्वेज, त्याची स्टाईल सर्वांनाच आकर्षित करत आहेत. आकाश या सिरीजमध्ये किशन यादव नावाच्या आर्मी ऑफिसरची भूमिका निभावताना दिसणार आहे. त्याच्यासाठी ही भूमिका आणि ही सिरीज खूप महत्त्वाची आहे. कारण त्याला खऱ्या आयुष्यात आर्मी ऑफिसर व्हायचे होते. मात्र तो त्याचे ते स्वप्न पूर्ण करू शकला नाही, पण या सीरिजच्यानिमित्ताने त्याला त्याचे स्वप्न जगण्याची ही संधी मिळाली आहे. या वेबसीरिजसाठी आकाश फारच उत्साही आहे.
‘१९६२: दि वॉर इन दि हिल्स’ ही सिरीज वास्तविक घटनेवर आधारित आहे. कशाप्रकारे १२५ भारतीय सैनिक ३००० चीनी सैनिकांविरूद्ध लढले. हे या सिरीजमध्ये दिसणार आहे. या वेबसीरिजमध्ये आकाशबरोबरच, अभय देओल, सुमित व्यास मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिरींजचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सर्वानाच हा ट्रेलर आवडत आहे. यातला आकाशचा लुक समोर येताच त्याच्या फॅन्ससोबतच इतर कलाकारांनी सोशल मीडियावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे.
याआधी आकाशने नेटफ्लिक्सच्या ‘लस्ट स्टोरीज’ चित्रपटात राधिका आपटेसोबत भूमिका साकारली होती. या वेबसीरिज व्यतिरिक्त तो दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ चित्रपटातही आकाश दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करण्याची संधी त्याला मिळणार आहे.