Monday, August 4, 2025
Home मराठी ‘परश्या’ देतोय फिटनेसकडे लक्ष: ‘स्टे मोटिवेटेड’ म्हणत, शेअर केला त्याने वेट लिफ्टींग करतानाचा व्हिडिओ!

‘परश्या’ देतोय फिटनेसकडे लक्ष: ‘स्टे मोटिवेटेड’ म्हणत, शेअर केला त्याने वेट लिफ्टींग करतानाचा व्हिडिओ!

‘याड लागलं गं’ असं म्हणत महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनावर राज्य करणारा अभिनेता म्हणजेच आकाश ठोसर, अर्थातच आपल्या सर्वांनाच लाडका परश्या. ‘सैराट’ या चित्रपटानंतर एका रात्रीत स्टार झालेला हा अभिनेता अनेक प्रोजेक्टमधून समोर आला आहे. केवळ मराठीतच नाही, तर त्याने हिंदी वेब सीरिजमध्ये देखील काम केले आहे. एवढ्यातच मर्यादित न राहता त्याने अनेक मोठ्या जाहिरातीत काम केले आहे. त्यामुळे त्याची लोकप्रियता आता गगनाला भिडली आहे. आकाशने चित्रपटसृष्टीत आल्यानंतर खूप कमी कालावधीत त्याची ओळख निर्माण केली आहे. सोशल मीडियावर देखील त्याची तगडी फॅन फॉलोविंग आहे. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सतत सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड गाजतोय.

आकाशने सोशल मीडियावर त्याचा एका फिटनेस व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तो जिममध्ये आहे. तो वेट लिफ्टींग करताना दिसत आहे. त्याच्या या व्हिडिओला फिटनेस प्रेमींकडून भरभरून प्रतिसाद मिळताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी त्याने असाच एक फिटनेस व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये तो पुलअप्स मारताना दिसत होता.

त्याने आता जो वेट लिफ्टिंगचा व्हिडिओ शेअर केला आहे, तो व्हिडिओ शेअर करून त्याने कॅप्शन दिले आहे, “स्टे मोटिवेटेड.” तो घेत असलेली मेहनत या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. तसेच तो त्याचे ऍब्स दाखवत आहे. काही महिन्यांपूर्वी देखील तो अशीच मेहनत करताना दिसला होता. पण ही मेहनत तो ‘१९६२ : द वार इन द हिल्स’ या वेब सीरिजसाठी घेत असल्याची माहिती समोर आली होती.

या वेब सीरिजमध्ये आकाश एका सैनिकाच्या भूमिकेत दिसला होता. त्यामुळे तो त्याच्या फिटनेसबाबत खूप मेहनत घेत होता. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.

आकाश ठोसरच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने २०१६ रोजी नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शन केलेल्या ‘सैराट’ या चित्रपटातून त्याच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात केली होती. या एकाच चित्रपटाने त्याला खूप प्रसिद्धी मिळवून दिली. या नंतर त्याने ‘फ्रेंडशिप अनलिमिटेड’, ‘झुंड’, ‘लस्ट स्टोरीज’ या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा