Saturday, October 18, 2025
Home बॉलीवूड दुर्दैवच म्हणायचं अन् काय! आर्यन प्रकरणावर शाहरुखच्या ‘या’ १० मित्रांनी पाळले मौन; केले नाही एकही ट्वीट

दुर्दैवच म्हणायचं अन् काय! आर्यन प्रकरणावर शाहरुखच्या ‘या’ १० मित्रांनी पाळले मौन; केले नाही एकही ट्वीट

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या तुरुंगात आहे. महिन्याच्या सुरुवातीला, एनसीबीने क्रूझवर अं’मली पदार्थ पार्टीवर छापा टाकला होता जिथे आर्यन आणि त्याच्या अनेक मित्रांना पकडण्यात आले होते. एनसीबीच्या म्हणण्यानुसार, आर्यन खान त्याच्या मित्रांसोबत क्रूझवर अं’मली पदार्थाची पार्टी करणार होता. आर्यन खानच्या अटकेनंतर अनेक बॉलिवूड कलाकारांनी शाहरुख खानला पाठिंबा दिला आहे, पण त्याचे काही जवळचे मित्र अजूनही याप्रकरणी मौन बाळगून आहेत. आज आपण त्या कलाकारांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी अद्यापही शाहरुख खानला याप्रकरणी पाठिंबा दिलेला नाही.

आमिर खान
बॉलिवूड अभिनेता आमिर खान देखील आर्यन खान अं’मली पदार्थ प्रकरणात पूर्णपणे शांत आहे. तसे पाहिले, तर आमिर खान अनेकदा अनेक मोठ्या मुद्द्यांवर निर्दोष मत देताना दिसला आहे.

अजय देवगण
बॉलिवूड अभिनेत्री काजोलप्रमाणे अजय देवगणने देखील आर्यन खान अं’मली पदार्थ प्रकरणी काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. लोक अजय देवगणबद्दल अनेक प्रकारचे प्रश्न विचारत आहेत.

अक्षय कुमार
बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. मात्र, त्याने आर्यन खान प्रकरणात मौन पाळले आहे. त्याने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

अनिल कपूर
बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर यांची गणना इंडस्ट्रीतील अशा कलाकारांमध्ये केली जाते, जे प्रत्येकाला एका कुटुंबाप्रमाणे पुढे घेऊन जातात. मात्र, आर्यन खानच्या अटकेनंतर त्यांनी अद्यापही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

अनुपम खेर
अभिनेते अनुपम खेर अनेकदा प्रत्येक मुद्द्यावर आपला दृष्टिकोन मांडताना दिसतात. नात्र, यावेळी त्यांनीही मौन पाळले आहे. मात्र, अनुपम खेर यांचा मुलगा सिकंदर खेरने या प्रकरणी शाहरुख खानला पाठिंबा दिला आहे.

धर्मेंद्र
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनीही शाहरुख खानच्या समर्थनार्थ काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. धर्मेंद्र यांचे मौन चाहत्यांना हैराण करणारे आहे.

जॅकी श्रॉफ
याप्रकरणी जॅकी श्रॉफ यांचे मौन सर्वांचेच मन तोडत आहे. जॅकी यांनी शाहरुख खानच्या बाजूने एकही ट्वीट केलेले नाही.

काजोल
बॉलिवूड अभिनेत्री काजोल आणि शाहरुख खानची मैत्री प्रत्येकानेच पाहिली आहे, पण आर्यन खानच्या अटकेबद्दल तिचे मौन समजण्यापलीकडचे आहे.

संजय दत्त
बॉलिवूड अभिनेता संजय दत्तही या प्रकरणी मौन बाळगून असून शाहरुख खानच्या समर्थनार्थ त्याच्या बाजूने कोणतेही विधान आलेले नाही.

टायगर श्रॉफ
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ देखील त्याच्या वडिलांप्रमाणे या प्रकरणात मौन बाळगून आहे.

एक स्टारकिड असल्याने चाहते अपेक्षा करत होते की, तो नक्कीच दुसऱ्या स्टारकिडला याप्रकरणी पाठिंबा देईल.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बिग बॉस १५’मधील ‘हे’ स्पर्धक राडा घालण्यात ठरत आहे अव्वल

-भोजपुरी सुपरस्टार रवी किशनच्या सर्व सुखसोयींनीयुक्त अशा आलिशान घराचे फोटो पाहिलेत का?

-शाहरुखच नाही, तर त्याच्यासारखा दिसणारा व्यक्तीही संकटात; आर्यनच्या अं’मली पदार्थ प्रकरणानंतर मिळत नाहीये काम

हे देखील वाचा