Saturday, August 2, 2025
Home साऊथ सिनेमा अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’मधील हटवलेला ‘तो’ सीन नवीन वर्षावेळी पुन्हा झाला रिलीझ, व्हिडिओ झाला व्हायरल

अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’मधील हटवलेला ‘तो’ सीन नवीन वर्षावेळी पुन्हा झाला रिलीझ, व्हिडिओ झाला व्हायरल

अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) अभिनित ‘पुष्पा: द राइज’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. १ आणि २ जानेवारीला शनिवार-रविवार असल्यामुळे नवीन वर्षाच्या वीकेंडला चित्रपट जबरदस्त व्यवसाय करू शकतो. १७ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या दोन आठवड्यांत देशभरातील चित्रपटगृहांमधून बॉक्स ऑफिसवर २०० कोटींची कमाई केली आहे. याशिवाय परदेशात राहणारे  प्रेक्षकही त्याचे खूप कौतुक करत आहेत आणि अभिनेत्याच्या अभिनयाचे चाहते झाले आहेत. चित्रपटाच्या काही सीनवरही वाद निर्माण झाला होता. त्यानंतर निर्मात्यांनी तो कट करून टाकला होता. पण नवीन वर्षादरम्यान हटवलेला सीन पुन्हा जोडून प्रदर्शित करण्यात आला आहे.

अल्लूचा मास सीन पुन्हा झाला प्रदर्शित
‘पुष्पा’च्या निर्मात्यांनी शुक्रवारी सीन हटविला, जो आता पुन्हा प्रदर्शित झाला आहे. हे सीन सोशल मीडियावर खूप लोकप्रिय झाले आहे आणि मूळ तेलुगू प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. या सीनमध्ये अल्लूच्या ( Allu Arjun) आईला कर्ज फेडता न आल्याने सावकाराकडून फटकारताना दिसत आहे. सावकाराच्या या कृत्याने पुष्पराज दुखावला जातो आणि रागाच्या भरात उसने घेतलेले पैसे परत करतो. तो त्या व्यक्तीला गावातील प्रत्येकाला त्याच्या कर्ज मंजूरीबद्दल माहिती देण्यास सांगतो. नंतर अल्लू त्या माणसाला गावात घेऊन फिरताना दिसतो. आईच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी ‘पुष्पा’ असे करते.

फहाद फासिल आणि अल्लूचा न्यूड सीनही आला होता हटवण्यात
‘पुष्पा: द राइज’च्या मूळ प्रिंटमध्ये मर्यादित रन-टाइमसाठी जागा देण्यासाठी हा सीन कापण्यात आला होता. हटवलेल्या या सीनने अनेक प्रेक्षकांचे लक्ष वेधले होते, त्यामुळे तो पुन्हा ॲड करण्यात आला आहे. शिवाय आणखी सीन काढून टाकण्यात आले आहेत, ज्यामध्ये अल्लू आणि रश्मिका यांच्यातील एक रोमँटिक सीन देखील आहे.

अल्लू आणि फहद फासिल चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये न्यूड दिसणार होते. परंतु निर्मात्यांनी पुराणमतवादी तेलुगू प्रेक्षकांच्या भीतीने ते ठेवले नाही आणि एक नवीन सीन तयार केला. या चित्रपटात समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) देखील आहे, जी अल्लूसोबत एका खास डान्समध्ये बोल्ड स्टाईलमध्ये दिसत आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा