अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर शहनाझ गिल सोशल मीडियापासून दुरावली होती. सार्वजनिक ठिकाणीही ती क्वचितच दिसत होती. माध्यमांतील वृत्तामध्ये असा दावा केला जात होता की, ती शॉकमध्ये आहे. तिला यातून बाहेर यायला थोडा वेळ लागेल. दरम्यान, सिद्धार्थ शुक्लाच्या जाण्यानंतर ५६ दिवसांनी पहिल्यांदाच शहनाझने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक पोस्ट केली ज्यामध्ये तिने सिद्धार्थला श्रद्धांजली लिहिली. तो व्हिडिओ दुसऱ्या दिवशी प्रेक्षकांमध्ये आल्यानंतर प्रेक्षकांनी तिला भरभरून प्रेम दिले, तर काहींनी शहनाझला ट्रोल करण्यास सुरुवात केली. ट्रोल झाल्यानंतर अभिनेता अली गोनी शहनाझच्या समर्थनार्थ उतरला आहे.
एका ट्विटर युजरला दिले उत्तर
सोशल मीडियावर एका युजरच्या ट्वीटला उत्तर देताना एली गोनीने शहनाझचे समर्थन केले. ज्या युजरला गोनीने उत्तर दिले, त्याने त्याच्या ट्विटरवर शहनाझच्या श्रद्धांजली व्हिडिओचे स्क्रीनशॉट शेअर केले आणि पोस्टमध्ये शहनाझला ट्रोल केले. ज्यावर गोनीने लिहिलं होतं की, “सिरीयसली थांबा.” त्यासोबत हात जोडणारा इमोजी वापरला आहे. त्या युजरने लिहिले होते की, “या दुर्दैवी घटनेवर आम्ही अजूनही शोक व्यक्त करत आहोत आणि जे लोक त्याचे जवळचे मित्र असल्याचा दावा करत आहेत ते श्रद्धांजलीच्या नावाखाली भावना विकत आहेत. कोणालातरी मृत्यूवर रील करण्यास सांगणे, व्ह्यूज आणि पसंती मोजणे, ते आणखी किती खालच्या पातळीला येतील? विनोद करणे थांबवा! सिद्धार्थ शुक्लाचा वापर करणे थांबवा.”
Stop it guys seriously ???????? https://t.co/bCPBMrAQ2U
— Aly Goni (@AlyGoni) October 30, 2021
शहनाझला दिला पाठिंबा
यानंतर अलीने आणखी एक ट्वीट केले, ज्यामध्ये त्याने सर्व ट्रोलर्सची बोलती बंद केली. या ट्वीटनंतर काही वेळातच अलीने ट्वीट केले की, “माझ्या शेवटच्या ट्वीटमध्ये काही गैरसमज झाला आहे असे मला वाटते. सर्वप्रथम, शहनाझ ही श्रद्धांजली द्यायला पात्र आहे आणि मला हे गाणे खूप आवडले आहे. दुसरे म्हणजे, ट्वीट त्या लोकांसाठी होते जे सिडच्या कव्हर गाण्याच्या रीलवर आणि प्रत्येकाचे नाव ओढत आहेत. ज्याचा उल्लेख त्या ट्वीमध्ये करण्यात आला होता. शांति.”
I think there is misunderstanding in my last tweet.. first of all Shehnaz ka poora Haq banta hai to tribute and I loved that song.. secondly that tweet was for those people who drag Sid in the name of cover songs reels and all. Jo uss tweet mein mention tha.. ✌️ #peaceout
— Aly Goni (@AlyGoni) October 30, 2021
शुक्रवारी शहनाझने एक नवीन म्युझिक व्हिडिओ लाँच केला. ज्यामध्ये तिने दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाला श्रद्धांजली वाहिली आहे. त्याच्या आठवणीत शहनाझने हे गाणे तयार केले आहे. शहनाझ आणि सिद्धार्थ यांच्यातील संस्मरणीय क्षणांचा या व्हिडिओमध्ये समावेश करण्यात आला आहे. ‘बिग बॉस १३’मध्ये दोघे एकत्र असतानाचे सर्व व्हिडिओ देखील यामध्ये दाखवण्यात आले आहेत. हे नवीन गाणे शहनाझने स्वतः गायले आहे. कलर्सच्या ‘बिग बॉस १३’च्या रियॅलिटी शोमध्ये सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाझ गिल एकमेकांच्या जवळ आले होते. या जोडीला खूप पसंती दिली जात होती. मात्र सप्टेंबरमध्ये सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘सिद्धार्थ तुझा आहे आणि तुझाच राहणार’, शहनाझ गिलचे नवीन गाणे बघून चाहत्यांना अश्रू अनावर
-सिद्धार्थ गेल्यानंतर शहनाझला पहिल्यांदाच मिळालं हसण्याचं कारण, आली ‘ही’ आनंदाची बातमी
-शहनाझ गिलपेक्षा तिचा ‘मुलगा’च आहे अधिक गोड, क्यूटनेसमध्ये तैमूर-इनायालाही देतोय जोरदार टक्कर