Tuesday, August 5, 2025
Home मराठी गौतमी मुळे आमच्या सिनेमाला बघायला लोक येतील; लाईक आणि सबस्क्राइबच्या ट्रेलर प्रदर्शनावेळी म्हणाला अमेय वाघ…

गौतमी मुळे आमच्या सिनेमाला बघायला लोक येतील; लाईक आणि सबस्क्राइबच्या ट्रेलर प्रदर्शनावेळी म्हणाला अमेय वाघ…

अभिनेता अमेय वाघ लवकरच लाईक आणि सबस्क्राइब या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अभिनेत्री अमृता खानविलकर हीदेखील मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमात गौतमी पाटील हिचे देखील एक गाणे ठेवले आहे. या सिनेमात लिंबू फिरलं हे आयटम सॉंग ठेवण्यात आले आहे. या गाण्यात अमेय वाघ हादेखील गौतमी बरोबर थिरकताना दिसत आहे. 

नुकताच लाईक आणि सबस्क्राइब या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. यावेळी अमेय वाघ याला गौतमी बरोबर डान्स करण्याविषयी विचारले गेले. त्यावर अमेय म्हणाला सिनेमात जो गौतमी बरोबर प्रसंग आहे त्यसाठी तिच्याशिवाय दुसरा चांगला पर्याय महाराष्ट्रात नाही. ती अगदी अबालवृद्धांची लाडकी आहे. तिचा कार्यक्रम असतो तेव्हा लोक झाडावर बसलेले असतात. छपरावर बसलेले असतात. तिच्या शो ला खूप गर्दी असते. हे सगळे लोक सिनेमा बघायला जात नाहीत म्हणून आम्ही आमच्या सिनेमात गौतमीला घेतले आहे. जशी तिच्या कार्यक्रमाला गर्दी होते तशीच आमच्या सिनेमाला देखील व्हावी असे अमेय म्हणाला. 

अलीकडेच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. हा एक रहस्यमयी सिनेमा आहे. येत्या अकरा ऑक्टोबरला हा सिनेमा प्रदर्शित होतो आहे. याचे दिग्दर्शन आणि लेखन अभिषेक मेरुरकर यांनी केले आहे.  

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

पहिल्या भागापेक्षाही दमदार असेल ‘देवरा’चा दुसरा भाग; ज्युनियर एनटीआर ने सांगितली सिक्वेल विषयी रोचक माहिती…

 

हे देखील वाचा