Tuesday, October 14, 2025
Home बॉलीवूड दु:खद! ‘यमला पगला दीवाना’ फेम अभिनेते अमित मिस्त्री यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

दु:खद! ‘यमला पगला दीवाना’ फेम अभिनेते अमित मिस्त्री यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

बॉलिवूड चित्रपटसृष्टीतून मोठी आणि दु: खद बातमी समोर येत आहे. टीव्ही आणि चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेते अमित मिस्त्री यांचे शुक्रवारी (२३ एप्रिल) निधन झाले आहे. त्यांचे निधन हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगितले जात आहे. त्यांचे मॅनेजर महर्षी देसाई यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे.

त्यांनी म्हटले की, “त्यांच्या निधनाने मला धक्का बसला आहे. ते पूर्णपणे ठीक होते आणि आपल्या घरीच होते. त्यांनी कधीही कोणत्या आजाराबद्दल तक्रार केली नव्हती. सकाळी नाष्टा केल्यानंतर त्यांच्या छातीत दुखायला लागले. हे सर्व इतके अचानक झाले की, त्यांना रुग्णालयातही नेता आले नाही.”

अमित यांच्या निधनानंतर अनेक कलाकार सोशल मीडियावर शोक व्यक्त करताना दिसत आहेत.

त्यांनी ‘तेनाली रामा’ आणि ‘मॅडम सर’ यांसारख्या टीव्ही मालिकेत काम केले होते. याव्यतिरिक्त त्यांनी ‘यमला पगला दीवाना’, ‘शोर इन द सिटी’ आणि अनेक वेब सीरिजमध्येही काम केले होते.

हे देखील वाचा