Monday, February 24, 2025
Home बॉलीवूड सुंदर! ‘महानायकां’ची नात नव्या नवेलीने शेअर केला आजी जया बच्चन यांच्यासोबतचा हृदयस्पर्शी फोटो शेअर

सुंदर! ‘महानायकां’ची नात नव्या नवेलीने शेअर केला आजी जया बच्चन यांच्यासोबतचा हृदयस्पर्शी फोटो शेअर

दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन आणि त्यांचे कुटुंब नेहमीच चर्चेत असते. अमिताभ यांची मुलगी श्वेता बच्चन नंदा हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण न करताही तिचे कुटुंबही नेहमीच चर्चेत असते. श्वेता बच्चनची मुलगी, अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा भलेही ग्लॅमरस दुनियेत काम करत नसली, तरी ती नेहमीच माध्यमांचे लक्ष वेधत असते. नव्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. नव्या सोशल मीडियावर तिच्या पोस्ट्सद्वारे नेहमीच चाहत्यांना आकर्षित करते. अशातच तिने तिची आजी जया बच्चन यांच्यासोबतचा एक हृदयस्पर्शी फोटो शेअर केला आहे, जो चाहत्यांना खूप आवडत आहे.

नव्या तिचे आजोबा अमिताभ बच्चन यांच्याप्रमाणेच, तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर कुटुंबाचे नवीन आणि न पाहिलेले फोटो पोस्ट करतात. या फोटोत ती आजीसोबत दिसत आहे. या फोटोत जया बच्चन यांनी गुलाबी रंगाच्या बॉर्डरची पांढरी साडी परिधान केली आहे, तर नव्याने पिवळ्या रंगाचा सलवार सूट परिधान केला आहे. नव्या मोकळ्या केसांमध्ये खूपच छान दिसत आहे. दोघेही एकमेकांकडे खूप प्रेमाने पाहत आहेत. हा फोटो दिवाळीचा आहे. नव्या आणि जया यांच्या या सुंदर फोटोला चाहतेही लाईक आणि कमेंट करून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

नव्याच्या या पोस्टला आतापर्यंत ३५ हजारांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत.

नव्याने तिच्या आजीसोबतचा फोटो शेअर करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही तिने अनेकदा फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोतही तुम्ही नात आणि आजीमधील प्रेम पाहू शकता. यामध्ये तिने कॅप्शनमध्ये फक्त “नानी,” असे लिहिले आहे.

नव्या तिचे आजोबा अमिताभ बच्चन यांच्या खूप जवळ आहे. या फोटोमध्ये तुम्ही त्यांचे बाँडिंग पाहू शकता. संपूर्ण बच्चन कुटुंब दिवाळीच्या निमित्ताने एकत्र होते. ज्याचा फोटो अमिताभ यांनी स्वतः सोशल मीडियावर शेअर केला होता. अमिताभ बच्चन, जया, ऐश्वर्या, अभिषेक, आराध्या आणि श्वेता नंदा यांची दोन मुलं, नव्या आणि अगस्त्यही फोटोत होते. बच्चन कुटुंबाचा फोटो चाहत्यांना चांगलाच आवडला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘असे’ केल्यास प्रियांका चोप्राला बसू शकतो पती निकचा मार, स्वतः केला खुलासा

-बॉलिवूडमध्ये १४ वर्ष पूर्ण केलेल्या रणबीर कपूरने नाकारले होते ‘हे’ सहा सुपरहिट सिनेमे

-नोरा फतेहीचे ‘कुसु कुसु’ गाणे प्रदर्शित, डान्स मूव्ह्जने चुकवला रसिकांच्या काळजाचा ठोका

हे देखील वाचा