अष्टपैलू भूमिका साकारणाऱ्या कलाकारांमध्ये महानायक अमिताभ बच्चन यांच्या नावाचाही समावेश होतो. सध्या अमिताभ यांचा ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. तसेच, दुसरीकडे ते छोट्या पडद्यावरही धमाल करत आहेत. सध्या ते ‘कौन बनेगा करोडपती 14‘ या शोचे सूत्रसंचालन करत आहेत. या शोमध्ये नेहमीच नवनवीन किस्से प्रेक्षकांना पाहायला आणि ऐकायला मिळतात. अशात, शोच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये त्यांनी सांगितले आहे की, त्यांच्या बंगल्याचे नाव ‘प्रतीक्षा’ का आहे आणि ते कुणी ठेवले होते?
बंगल्याचे नाव ‘प्रतीक्षा’ का आहे?
‘कौन बनेगा करोडपती 14’ (Kaun Banega Crorepati 14) शोदरम्यान अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी त्यांच्या बंगल्याच्या नावामागील किस्सा सांगितला. ते म्हणाले की, “लोक मला विचारतात की, तुम्ही तुमच्या घराचे नाव ‘प्रतीक्षा’ का ठेवले. मला त्यांना हे सांगायचे आहे की, हे नाव मी निवडले नव्हते. हे नाव माझ्या वडिलांनी निवडले होते. मी माझ्या वडिलांनी प्रश्न केला होता की, तुम्ही प्रतीक्षा नाव का ठेवले? त्यावेळी त्यांनी सांगितले होते की, त्यांची एक कविता आहे, ज्यामधील एक ओळ म्हणते की, ‘स्वागत सर्वांसाठी आहे, परंतु प्रतीक्षा कुणासाठीच नाहीये.'”
View this post on Instagram
आई-वडिलांसोबत राहायचे अमिताभ
महानायक अमिताभ यांचा ‘प्रतीक्षा’ बंगला (Pratiksha Bungalow) हा जुहूमध्ये आहे. ते त्यांच्या आई-वडिलांसोबत इथेच राहायचे. मात्र, त्यांच्या निधनानंतर अमिताभ त्यांच्या ‘जलसा’ या दुसऱ्या बंगल्यामध्ये शिफ्ट झाले. आता अमिताभ त्यांच्या कुटुंबासोबत ‘जलसा’ बंगल्यामध्येच राहतात. असे असले, तरीही ‘प्रतीक्षा’ हा बंगला अमिताभ यांच्या खूप जवळ आहे आणि ते नेहमी वेळ घालवण्यासाठी तिथे जातात.
अमिताभ यांचे सिनेमे
अमिताभ यांच्या सिनेमांबद्दल बोलायचं झालं, तर ते 9 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या ‘ब्रह्मास्त्र’ या सिनेमात झळकले होते. त्यांच्याव्यतिरिक्त या सिनेमात रणबीर कपूर, आलिया भट्ट, मौनी रॉय आणि नागार्जुन यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. माध्यमांतील वृत्तांनुसार, या सिनेमाने पहिल्या आठवड्यानंतर जगभरात 300 कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘डान्स आणि एक्शन सीन करु नकोस…’ ऋतिक रोशनला डॉक्टरांनी दिला सल्ला, अभिनेत्याचे उत्तर ऐकून कराल कौतुक
‘तुला दोन आई आहेत…’, म्हणत अली असगरच्या मुलांची उडवली होती खिल्ली, किस्सा ऐकून तुम्हीही व्हाल भावूक
आरआरआर ते विक्रम, ‘हे’ तमिळ चित्रपट 2022 मध्ये ठरलेत सुपरहिट