Saturday, July 27, 2024

आर्थिक परिस्थतीमुळे अमिताभ बच्चन यांनी मरीन ड्राईव्हच्या बाकावर काढल्या आहेत अनेक रात्री, मग पुढे…

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी बॉलिवूड जगताला एकापेक्षा एक जबरदस्त चित्रपट दिले आहेत. चाहत्यांमध्ये बिग बी म्हणून प्रसिद्ध असलेले अमिताभ हे इंडस्ट्रीचे सुपरस्टार आहेत. त्यासह ते सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असतात. त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून ते चाहत्यांसाठी सतत काही ना काही गोष्टी शेअर करतात. बिग बी त्यांच्या वयाच्या या टप्प्यात देखील इंडस्ट्रीत प्रचंड सक्रिय आहेत आणि प्रत्येक प्रकारच्या अभिनयात उत्तम कामगिरी करत आहेत. मग तो ऍक्शन सीन असो वा दुसरा कोणता. मात्र, अमिताभ बच्चन यांना ही प्रसिद्धी अशीच मिळाली नाही, तर त्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली आहे.

अमिताभ यांना आज बॉलिवूडचा शंहेशाह देखील म्हटलं जातं. पण एक काळ असा होता, जेव्हा त्यांना नोकरीसाठीही चकरा माराव्या लागत होत्या. आज आपल्या मेहनतीमुळे अमिताभ यांनी इंडस्ट्रीत ही ओळख मिळवली आहे. अमिताभ हे आज त्यांच्या दमदार आवाजासाठी देखील ओळखले जातात. पण एक वेळ अशी होती, जेव्हा त्यांना त्यांच्या आवाजामुळे ऑल इंडिया रेडिओमध्ये नकाराचा सामना करावा लागला होता.

एका मुलाखतीदरम्यान अमिताभ यांनी त्यांचे स्ट्रगलचे दिवस आठवत सांगितले होते. ते म्हणाले की, “मी ड्रायव्हिंग लायसन्स घेऊन मुंबईत आलो.” बिग बी पुढे म्हणाले की, “त्यांना वाटले की मी अभिनेता होऊ शकत नाही, मी फक्त टॅक्सी चालवीन.” अमिताभ बच्चन पुढे म्हणाले की, “पैशांच्या कमतरतेमुळे मी अनेक रात्री मरीन ड्राइव्हच्या बाकावर झोपलो.” अमिताभ बच्चन यांचा पहिला चित्रपट ‘सात हिंदुस्तानी’ होता. ज्यासाठी त्यांना फी म्हणून ५ हजार रुपये मिळाले होते.

अमिताभ बच्चन यांच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले, तर ते सध्या प्रभाससोबत साऊथ चित्रपटांमध्ये शूटिंग करत आहेत. त्यासह अमिताभ बच्चन यांनी अलीकडेच नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ या चित्रपटात काम केले आहे. हा चित्रपट अलीकडेच ४ मार्च रोजी प्रदर्शित झाला. ज्याने सर्वांचीच मने जिंकून घेतली. इतकेच नाही, तर ते रणबीर कपूर आणि आलिया भट्टसोबत ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात देखील दिसणार आहेत. याशिवाय अमिताभ यांच्याकडे ‘रनवे ३४’ चित्रपटही आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा