वडापाव हा प्रत्येक मराठी माणसाचा जवळचा विषय. वडापाव आवडत नाही असा व्यक्ती सापडणे जरा कठीणचं. म्हणूनच २३ ऑगस्ट हा दिवस खास वडापाव दिन म्हणून साजरा केला जातो. अनेकांनी या दिवसाच्या खास आठवणी सोशल मीडियावर शेअर केल्या होत्या. ज्यामध्ये त्यांनी आपल्या अनेक आठवणी सांगिल्या होत्या. यामध्ये मराठी अभिनेते अमोल कोल्हे यांची सोशल मीडिया पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.ज्यामध्ये त्यांनी वडापाव आणि त्यांच्या संघर्षाच्या काळातील आठवणींंना उजाळा दिला आहे.
याबाबत संपूर्ण माहिती अशी की, अमोल कोल्हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते म्हणून ओळखले जातात. आपल्या दमदार अभिनयाने आणि अनेक आव्हानात्मक भूमिकांनी त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या ऐतिहासिक भूमिकांसाठी ओळखले जातात. अमोल कोल्हे सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय असतात. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन ते अनेक किस्से, आठवणी आपल्या चाहत्यांशी शेअर करत असतात.
नुकतीच त्यांनी जागतिक वडापाव दिनानिमित्त केलेली एक पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या संघर्ष काळातील आठवण सांगितली आहे. यामध्ये ते म्हणतात की, “वडापाव- अनेक आठवणी. शाळेत हट्टाने खाल्लेला गाडीवरचा वडापाव, मग पुण्यात आल्यावर बालगंधर्व रंगमंदिराच्या बाहेर जोशी वडेवाले. आणि मग स्वप्नांचा पाठलाग करत मुंबईत स्थिरावताना कधी धावपळीतला ब्रंच तर कधी खिशाला परवडणारं पूर्णब्रह्म! स्थिरावल्यावर डाएट, वजन, पथ्य याकडे पाहून टाळलेला वडापाव कोणेकाळी आधार होता या विचारानं हसू येतं. रिमझिम पाऊस, गरमागरम वडापाव, तळलेली मिरची आणि फर्मास चहा..स्थळ कुठलंही असो, या मेन्यू ला तोड नाही.”
View this post on Instagram
त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून त्यावर चाहत्यांच्या जोरदार प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. दरम्यान अमोल कोल्हे सिनेसृष्टीसह राजकारणातही सक्रिय सहभागी असतात. ते शिरुर मतदार संघाचे विद्यमान खासदार आहेत.
हेही वाचा –
‘या’ दाक्षिणात्य कलाकारांनी लग्नात ओतला पाण्यासारखा पैसा, पण संसार काही टिकला नाही
बॉयकॉट करुनही सुपरहिट! आमिर खानच्या ‘लालसिंग चड्ढा’ चित्रपटाची परदेशात छप्परफाड कमाई
रिक्षाने प्रवास करताना पलक तिवारीने केले ‘असे’ चाळे, फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल