Wednesday, July 3, 2024

मोठी बातमी! आमिर, माधवननंतर आता मिलिंद सोमणही कोरोना पॉझिटिव्ह, सोशल मीडियावरून दिली माहिती

कोरोना व्हायरसने आपले चांगलेच पाय पसारले आहेत. अगदी सामान्य व्यक्तींपासून ते कलाकारांपर्यंत अनेकांना या व्हायरसचा सामना करावा लागत आहे. नुकतेच अभिनेता आमिर खान आणि आर माधवन कोरोना पॉझिटिव्ह आढळले. यानंतर आता मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमणही कोरोना पॉझिटिव्ह झाला आहे. याची माहिती स्वत: त्याने सोशल मीडिया अकाउंटवरून दिली आहे.

मिलिंदने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर “टेस्ट पॉझिटिव्ह” असे लिहित आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगितलेे.

यापूर्वी माधवनने ‘३ इडियट्स’ चित्रपटाचे एक पोस्टर शेअर करून आपल्याला कोरोना झाल्याचे सांगितले होते. या पोस्टरमध्ये तो आमिर खानसोबत बसलेला दिसत आहे. त्याने हा फोटो शेअर करत लिहिले की, शेवटी व्हायरसने रँचोपाठोपाठ फरहानलाही पकडले आणि ही एक अशी जागा आहे, जिथे राजू येऊ नये असे त्यांना वाटत आहे.

माधवनने ट्वीट करत लिहिले की, “फरहानने रँचोला फॉलो केले आणि व्हायरस नेहमी आमच्या मागे राहिला. परंतु यावेळी आम्हाला त्याने पकडले. ऑल इझ वेल आणि कोव्हिड लवकरच बरा होईल. ही एक अशी जागा आहे, जिथे राजू येऊ नये, असे आम्हाला वाटत आहे. तुम्हा सर्वांच्या प्रेमासाठी खूप खूप धन्यवाद. मी एकदम ठणठणीत आहे.”

अलीकडेच रणबीर कपूर, संजय लीला भन्साळी, कार्तिक आर्यन, वरुण धवन, नीतू सिंग यांसारखे बॉलिवूड कलाकारही कोरोना पॉझिटिव्ह आढळले.

आयएमडीबीनुसार, मिलिंद सोमणने आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात सन १९९५ मध्ये टीव्ही सीरिज ‘दीवारें’मधून केली होती. यानंतर त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. आज तो आपल्या कारकीर्दीच्या शिखरावर आहे. तो नेहमी आपल्या फोटो, व्हिडिओंमुळे चर्चेचा विषय ठरत असतो.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-माणुसकीचे उत्तम उदाहरण! मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंतने दिले घुबडाला जीवनदान; सर्वत्र होतंय कौतुक

-हॉटेल रूममध्ये एकटीच असलेली सनी लिओनी अचानक मारू लागली बेडवर उड्या; चाहत्यांकडून व्हिडिओला मिळतंय भरभरून प्रेम

-भल्या भल्यांना रडवणाऱ्या कंगना रणौतला ‘या’ कारणामुळे अश्रू अनावर

हे देखील वाचा