Monday, July 1, 2024

अनिल कपूर अन् त्यांच्या पत्नीने नातू वायूला दिले ‘हे’ खास गिफ्ट, जाणून घ्या गिफ्टचा अर्थ

चित्रपटांसाठी करोडो रुपये फी घेणारे बॉलीवूड सेलिब्रिटी मनमोकळेपणाने आपल्या कुटुंबासाठी खर्च करतात. स्टार किड्स अनेकदा त्यांच्या वाढदिवसाला महागड्या भेटवस्तू देताना दिसतात. यावेळी सोनम कपूर हिचा मुलगा वायु कपूर आहुजा याला देखील आजाेबा अनिल कपूर कडून असे काही भेटवस्तू मिळाले की, त्याची साेशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. वायुला त्याचे आजोबा अनिल कपूर आणि आजी सुनीता कपूर यांच्याकडून खूप गोड भेट मिळाली आहे. या भेटवस्तूचा फोटो आई आणि अनिल कपूरची मुलगी सोनम कपूर हिने तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

सोनम(sonam kapoor) हिने या वर्षी ऑगस्टमध्ये मुलाला जन्म दिला. तिने आपल्या मुलाचे नाव वायू असे ठेवले आहे. नामकरणानंतर अभिनेत्रीने या नावाचे महत्त्वही लोकांना सांगितले. आता अभिनेत्रीने वायूला मिळालेल्या भेटवस्तूचा फोटो तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर चाहत्यांसह शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ikkis.21 (@ikkis.21)

अनिल कपूर (anil kapoor) आणि त्यांच्या पत्नी सुनीता (sunita kapoor) हिने वायुला डिझायनर थाली आणि काही भांडी भेट दिली आहेत. एका इंस्टाग्राम हँडलवरून या गिफ्टबद्दल काही खास माहितीही देण्यात आली आहे. यापूर्वी 21 सप्टेंबर रोजी सोनम कपूरने आपल्या मुलाच्या नामकरण सोहळ्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. तिच्या अधिकृत अकाऊंटवरून हे फोटो शेअर करताना अभिनेत्रीने वायु नावाचे महत्त्वही सांगितले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonam Kapoor Ahuja (@sonamkapoor)

साेनम कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, साेनमची लग्नानंतर चित्रपटांतील ऍक्टिव्हिटी थोडी कमी झाली आहे. 2020 मध्ये रिलीज झालेल्या ‘AK Vs AK’ या चित्रपटात ती शेवटची दिसली होती. तिच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच ‘ब्लाइंड’ या चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
18 वर्षांच्या संघर्षानंतर ‘कांतारा’चा अभिनेता कसा बनला सुपरस्टार? जाणून घ्या एका क्लिकवर

पलक तिवारी लवकरच झळकणार ‘या’ हॉरर कॉमेडी चित्रपटात, अभिनेत्यानं शेअर केली पाेस्ट

हे देखील वाचा