Friday, December 27, 2024
[aioseo_breadcrumbs]

Video: युट्यूबवर राडा करतंय अंकुश अन् शिल्पीचं ‘हे’ गाणं, तुम्ही पाहिलं का?

दरदिवशी भोजपुरी सिनेसृष्टीतून नवनवीन गाणी प्रदर्शित होत आहेत. चटकन प्रेक्षकांच्या जीभेवर रुळणारी ही गाणी एका दिवसातच लाखो हिट्स मिळवतात. असेच एक भोजपुरी गाणे प्रदर्शित झाले आहे, ज्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. हे गाणे आहे भोजपुरी अभिनेता अंकुश राजा याचे. अंकुश याने त्याच्या अभिनयाने आणि गाण्यांनी चांगला चाहतावर्ग निर्माण केला आहे. त्यामुळे त्याचा कोणताही सिनेमा किंवा गाणे प्रदर्शित होताच जोरदार व्हायरल होते. असेच त्याच्या नवीन गाण्याबाबतही आहे.

अंकुश राजा (Ankush Raja) आणि अभिनेत्री शिल्पी राघवानी (Shilpi Raghwani) यांचा आपला वेगळा चाहतावर्ग आहे. दोघे जेव्हाही एकत्र येतात, तेव्हा हे त्यांच्या चाहत्यांसाठी कोणत्याही भेटवस्तूपेक्षा मोठे नसते. अशात आता त्यांचे सरकारच्या ‘अग्निपथ स्कीम’वर आधारित आहे. हे गाणे अंकुश आणि शिवानी सिंग (Shivani Singh) यांनी गायले आहे. या गाण्यात अंकुश आणि टिक टॉक स्टार शिल्पी राघवानी (Tik Tok Star Shilpi Raghwani) यांची केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.

अंकुश राजा याच्या नवीन गाण्याचे नाव ‘नौकरिया त लाग गईल के’ (Naukariya ta laag gail Army Ke) असे आहे. या गाण्याचा व्हिडिओ अंकुश राजा याच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आला आहे. हे गाणे प्रदर्शित होऊन फक्त एक दिवस झाला आहे. या एकाच दिवसात गाण्याला युट्यूबवर तब्बल ९ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, ५० हजारांहून अधिक लाईक्सही मिळाले आहेत.

गाण्याबाबत बोलायचं झालं, तर यामध्ये दिसते की, अभिनेत्याला सैन्यात सरकारी नोकरी मिळाली आहे. यामुळे त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. तसेच, तो गर्लफ्रेंड बनलेल्या शिल्पीला सांगतो. मात्र, ती खुश होत नाही. कारण, ही नोकरी फक्त ४ वर्षांसाठीच असते. शिल्पी म्हणते की, अभिनेत्याला पर्मनंट नोकरी मिळायला पाहिजे. अशात दोन्ही कलाकारांचे डान्स मूव्हजही पाहायला मिळत आहेत. या गाण्यात शिल्पी तिच्या एक्सप्रेशन्सनेही सर्वांचे मन जिंकले आहे.

या गाण्याच्या निर्मितीबाबत बोलायचं झालं, तर गाण्याचे बोल गरदा सियदिह यांनी लिहिले आहेत. तसेच, व्हिडिओचे दिग्दर्शन आर्यन देव यांनी केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा