बॉलिवूडचे दिग्गज आणि प्रतिभावान अभिनेते अन्नू कपूर यांना तब्येत अस्वस्थ असल्यामुळे रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार त्यांना छातीमध्ये दुखत असल्यामुळे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांना सध्या हॉस्पिटलमध्येच राहण्यास सांगितले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. आता त्यांच्या तब्येतीमध्ये बराच सुधार असल्याचे समजत आहे.
अन्नू कपूर यांना आज सकाळी गंगाराम हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले गेले होते. अन्नू कपूर यांचे हेल्थ अपडेट हॉस्पिटलचे चेयरमन असलेल्या डॉक्टर अजय यांनी दिले आहे. त्यांनी सांगितले की, त्यांना छातीत दुखण्याचा त्रास सुरु झाला आणि मग रुग्णालयात आणण्यात आले. अन्नू कपूर यांच्यावर डॉ. सुशांत उपचार करत असून, आता ते स्टेबल आहे आणि उपचारांना प्रतिसाद देखील देत आहे.

अन्नू कपूर यांचे मॅनेजर असलेल्या सचिन यांनी खुलासा केला आहे की, अन्नू कपूर यांना चेस्ट कंजंक्शन झाल्यामुळे छातीत दुखण्याचा त्रास सुरु झाला. सध्या ते निरीक्षणाखाली असून, ते स्वस्थ आहेत. अन्नू कपूर यांना आज सकाळी ऍडमिट केले असून, ते जेवण देखील घेत असून सर्वांशी बोलत देखील आहे.
तत्पूर्वी अन्नू कपूर हे उत्तम अभिनेते असण्यासोबतच गायक, दिग्दर्शक, रेडिओ जॉकी, सूत्रसंचालक देखील आहे. त्यांनी १०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले असून, ४० वर्षांपेक्षा अधिक काळ त्यांनी या इंडस्ट्रीमध्ये काम केले आहे. यासोबतच ते रेडिओवर ‘सुहाना सफर विद अन्नू कपूर’ हा शो देखील करता. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘नाद कार पण…! शाहरुख खान स्टारर ‘पठाण’ चित्रपटाची पहिल्याच दिवशी विक्रमी कमाई
अथिया शेट्टीचा नमस्कार करताना दिसला अहान शेट्टी, फोटो पोस्ट करत म्हणाला…