बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर गुरुवारी (२६ ऑगस्ट) त्यांच्या लग्नाचा ३६ वा वाढदिवस साजरा करत आहेत. या निमित्ताने अनुपम यांनी पत्नी किरण खेर यांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत.
अनुपम खेर यांनी त्यांच्या लग्नाचे काही ब्लॅक एँड व्हाईट फोटो शेअर केले आहेत, ज्यात दोघांचे जबरदस्त बॉडिंग दिसून येत आहे. हे फोटो शेअर करताना अनुपम खेर यांनी लिहिले की, “किरण ३६ व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. हसू, आनंद, अश्रू, वाद, मैत्री, प्रेम आणि एकमेकांसोबत हा एक मोठा प्रवास आहे. हे सर्व रंग या ब्लॅक एँड व्हाईट फोटोमध्ये आहेत. सुरक्षित आणि निरोगी राहा. नेहमी प्रेम आणि प्रार्थना.”
कलाकारांनी दिल्या शुभेच्छा
अभिनेता अनुपम खेर आणि किरण खेर यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अनेक कलाकारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. कंगना रणौतने शुभेच्छा देत लिहिले की, “तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.” जुगल हंसराज यांनी लिहिले की, “तुमच्या दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.” याबरोबरच सोनी राजदान यांनी लिहिले की, “लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रिय. तुम्हा दोघांना खूप प्रेम.”
सन १९८५ मध्ये झाले लग्न
किरण आणि अनुपम यांचे सन १९८५ मध्ये लग्न झाले होते. त्यांची लव्हस्टोरी ही एखाद्या फिल्मी स्टोरीपेक्षा कमी नाही. किरण आणि अनुपम यांची पहिली भेट चंदिगडमध्ये झाली. तेथे दोघेही चंदिगड थिएटर ग्रूपचा भाग होते. परंतु १९८० मध्ये किरण चंदिगडहून मुंबईला आल्या आणि येथेच त्यांचे पहिले लग्न उद्योगपती गौतम बॅरीसोबत झाले. त्यांचा मुलगा सिकंदरचा जन्म १९८१ मध्ये झाला आणि ४ वर्षांनी किरणला समजले की, त्यांच्या वैवाहिक जीवनात सर्व काही ठीक नाही. (Actor Anupam Kher and wife Kiran Kher celebrated their 36th wedding anniversary)
त्याचबरोबर अनुपम यांचे पहिले लग्न १९७९ मध्ये मधुमालती नावाच्या मुलीशी कौटुंबिक दबावाखाली झाले आणि तेही या लग्नामुळे खुश नव्हते. किरण आणि अनुपम जेव्हा ‘नादिरा बब्बर’ च्या नाटकासाठी कोलकाताला गेले, तेव्हा ते तिथे पुन्हा भेटले. या भेटीनंतर अनुपम यांनी किरणला प्रपोज केले. त्यानंतर दोघे वारंवार भेटू लागले. दोघांनीही त्यांच्या जोडीदारापासून घटस्फोट घेतला आणि १९८५ मध्ये लग्न केले. अनुपम यांनी किरण खेर यांचा मुलगा सिकंदरचा स्वीकार केला आणि त्याला त्यांचे आडनाव दिले.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘परी म्हणू की सुंदरा, श्रुतीची अदा करी नेहमीच फिदा,’ अभिनेत्रीच्या फोटोंचा सोशल मीडियावर राडा
-मोनालिसाने ‘साड़ी के फॉल सा’ गाण्यावर लावले जोरदार ठुमके; सोनाक्षीचाही डान्स वाटेल तिच्यासमोर फिका
-‘पद्मावत’ फेम सरभ आहे मानसशास्त्राचा पदवीधर; रणवीरला त्याची ‘ही’ गोष्ट आवडल्याने मिळाला चित्रपट