बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर या दिवसात सोशल मीडियावर बरेच सक्रिय असताना दिसतात. सोशल मीडियावर ते त्यांचे अनेक मजेशीर व्हिडिओ शेअर करत असतात. त्यांच्या लोकप्रियतेमुळे त्यांच्या पोस्टला खूप लाईक्स आणि कमेंट मिळत असतात. नुकताच अनुपम खेर यांनी त्यांचा एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी समस्त टक्कल असलेल्या व्यक्तींसाठी एक गाणे समर्पित केले आहे. अनुपम खेर यांनी सांगितले आहे की, त्यांनी हे गाणे का आणि केव्हा लिहिले.
अनुपम खेर यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत असे लिहले आहे की, “जगभरातील टकल्यांना समर्पित, आज पासून 40 वर्षापूर्वी मी मुंबईला माझं नशीब आजमवण्यासाठी आलो होतो, तेव्हा माझे केस खूपच गळत होते. सगळे या गोष्टीला माझे नशीब समजत होते, तर मी याला माझी खासियत समजत होतो. मी स्वतःला आणि संपूर्ण दुनियेला हसवण्यासाठी एक गाणे लिहले.”
दुनिया भर के गंजों को समर्पित..
आज से 40 साल पहले जब मैं मुंबई फ़िल्मों में अपनी क़िस्मत आज़माने आया था तो मेरे बाल झड़ रहे थे और अस्त व्यस्त थे।लोग इसे मेरी क़िस्मत कहते थे और मैं इसे अपनी खासियत कहता था।ऐसे में मैंने ख़ुद को और ज़माने को हंसाने के लिए गंजो पर ये गाना लिखा।???????? pic.twitter.com/EP3aUcWfmH— Anupam Kher (@AnupamPKher) March 19, 2021
त्यांनतर अनुपम खेर यांनी ‘ये मेरे प्यारे वतन’ या गाण्याच्या चालीवर “ये मेरे पीछडे बाल फिर से उग आओ सालो, तुम पे मैं कूर्बान, जुल्म के पंजो मे है, मैं भी अब गंजो में हू, सर हुआ विरान,” हे गाणे लिहिले आहे. त्यानंतर त्यांनी सांगितले की, त्यांना खूप आनंद होत आहे की, त्यांना केस नाहीत.
अनुपम खेर यांच्या या पोस्टवर अनेक युजर्सने प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने असे लिहिले आहे की, ‘एवढं काही नाही सर, बॉलिवूडमध्ये जेवढे कोण प्रसिद्ध अभिनेते आहेत ते सर्व टक्कल असलेलेच आहेत.’ भारतात अजूनही असे अनेक लोक आहेत जे हेअर ट्रान्सप्लांट करून घेतात.
अनुपम खेर हे एक नावाजलेले अभिनेते आहेत. त्यांनी केवळ देशातच नव्हे, तर अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील त्यांचं नाव कमावलं आहे. सेन्सर बोर्डचे अध्यक्ष झालेले पद्मश्री अनुपम खेर यांना आठ वेळा वेगवेगळ्या श्रेणीमध्ये फिल्म फेअर पुरस्कार मिळाला आहे. शिवाय त्यांना दोन वेळा राष्ट्रीय फिल्म पुरस्कारने देखील नावाजले गेले होते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अक्षरा सिंगच्या ‘पगली बुलावे’ गाण्याची यूट्यूबवर जोरदार एंट्री! पुन्हा लावले चाहत्यांना वेड
-सपना चौधरीला टक्कर देत, हरियाणवी गायिका रेणुका पंवार घेऊन आली नवं गाणं! पाहा व्हिडिओ